दैनिक परिपाठ
02 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
🔺️ दिनविशेष
१९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन.
१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : गढून जाणे - अर्थ : मग्न होणे, गुंग होणे.
▪️वाक्य : सुदेश चित्र काढण्यात नेहमी गढून जातो.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : राज्याचे घोडे आणि खासदार उडे
▪️अर्थ : वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची.
🔺️ कोडे
▪️ म्हणतात मला फळांचा राजा,
खाल्ल्यावर वाटते मज्जाच मजा !
▪️उत्तर - आंबा
🔺️ सामान्यज्ञान
१) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश
२)भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू
आणि काश्मीर)
३)नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982
४) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद
५) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची
पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी
🔺️ बोधकथा
म्हातारीची खीर
एका गावात एक वृद्ध महिला राहत होती, तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती, एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना!. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेंव्हा गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला, आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे, मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली व म्हणाला, आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि साखर असती तर ना खूप मज्जा आली असती. महिलेने विचार केला थोडे तांदूळ आणि साखर दिली तर काय बिघडते. तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दुध, वेलची आणि सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने कंजूष महिलेच्या घरी खीर खाल्ली.
तात्पर्य - बुद्धीच्या जोरावर संकटकाळातही आपण आपले काम सध्या करू शकतो.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon