ज्ञानकुंभ - 56
भाज्यांची नावे सांगा.
🔶️ संकलित
❇️ गुरुवार दिनांक 02/04/2026
उपक्रम : भाज्यांची नावे सांगा.
🔺️ प्रश्नसूची
१) नदीची भाजी =
२) आई वडिलांची भाजी=
३) प्रेमळ भाजी=
४) 'ट' नसलेल्या' प्राण्यांच्या अवयवांची भाजी=
५) अडाणी भाजी=
६) मूळ स्वभाव न बदलणारी भाजी =
७) थंड गावाची भाजी=
८) सचिनची भाजी =
९) फुलांची भाजी=
१०) वड्याचा आग्रह धरणारी भाजी=
११) सफेद भाजी=
१२) मडक्याची भाजी=
१३) अक्षतांची भाजी=
१४) गणितातल्या गुणांची भाजी=
१५) पुंगीची भाजी=
१६) बत्तीस गावाची भाजी=
१७) अकलेची भाजी=
१८) बोबड्या सुरांची भाजी=
१९) पुराणातली भाजी=
२०) काना,मात्रा नसलेली भाजी=
२१) आंबट खिळ्यांची भाजी=
२२) फक्त मधले अक्षर वेगळे असलेली भाजी=
२३) आवळ्याच्या बदल्यात घेतलेली भाजी=
२४) घोड्याची भाजी=
२५) कोल्ह्याला राजी करणारी भाजी=
२६) चांगल्या युद्धभूमीची भाजी =
🔺️ उत्तरसूची
🔹️भाज्यांची नावे सांगा
१) नदीची भाजी = मुळा
२) आई वडिलांची भाजी= पालक
३) प्रेमळ भाजी= मायाळू
४)'ट 'नसलेल्या'प्राण्यांच्या अवयवांची भाजी= शेपू
५) अडाणी भाजी= गवार
६) मूळ स्वभाव न बदलणारी भाजी= कारले
७) थंड गावाची भाजी= सिमला मिरची
८) सचिनची भाजी = तोंडली
९) फुलांची भाजी= फुलकोबी
१०) वड्याचा आग्रह धरणारी भाजी= घेवडा
११) सफेद भाजी= मशरूम
१२) मडक्याची भाजी= माठ
१३) अक्षतांची भाजी= तांदुळजा
१४) गणितातल्या गुणांची भाजी= भोपळा
१५) पुंगीची भाजी= गाजर
१६) बत्तीस गावाची भाजी= शिराळे
१७) अकलेची भाजी= कांदा
१८) बोबड्या सुरांची भाजी= कांदा
१९) पुराणातली भाजी= वांगी
२०) काना,मात्रा नसलेली भाजी= पडवळ
२१) आंबट खिळ्यांची भाजी= आंबट चुका
२२) फक्त मधले अक्षर वेगळे असलेली भाजी= टोमॅटो
२३) आवळ्याच्या बदल्यात घेतलेली भाजी= कोहळा
२४) घोड्याची भाजी= हरभरा
२५) कोल्ह्याला राजी करणारी भाजी= काकडी
२६) चांगल्या युद्धभूमीची भाजी = सुरण

1 comments:
Click here for commentsसंस्कृती घोरड
ConversionConversion EmoticonEmoticon