सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 29 March

दैनिक परिपाठ

29 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
कविता म्हणजे भावनांचं चित्र!

🔺️ दिनविशेष 
१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले. 

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : खपणे - अर्थ : कष्ट करणे. 

▪️वाक्य : चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : अडली गाय फटके खाय 

▪️अर्थ  : एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला त्रास दिला जातो.

🔺️ कोडे 
▪️ बत्तीस जणांना ठेवते गुपचूप  

▪️उत्तर - तोंड

🔺️ सामान्यज्ञान 
 १) सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
 उत्तर : कोपर्निकस
 २) खाफीखान या मुघल इतिहासकाराने
कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला
आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई
३) रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG
४) कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख
(Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर
५) युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली
महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल
🔺️ बोधकथा
                    पापाचा जनक
एका राजाने आपल्या दरबारात सभासदांना विचारले कि पापाचा जनक कोण असतो? पण उत्तर मिळाले नाही. राजाने आपल्या राजगुरुंकडे मान वळविली. ते परमज्ञानी होते. पण तत्काळ त्यानाही काही उत्तर सुचले नाही. राजाने त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा काळ दिला. बऱ्याच चिंतन-मननानंतर राजगुरुना उत्तर मिळाले नाही. अशाप्रकारे सहा दिवस गेले. राजगुरू घाबरले त्यांनी भीतीपोटी राजधानी सोडली. चालत चालत एका गावात पोहोचले. तेथे एका घराच्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसले. ते घर एका गणिकेचे (वैश्येचे) होते. राजगुरुंची हि दमलेली अवस्था पाहून तिने त्यांच्याशी चर्चा सुरु केली. राजगुरूने तिला आपली सर्व कथा ऐकवली. गणिका म्हणाली," तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावे लागेल. " हे ऐकताच राजगुरू म्हणाले, "तुझ्या सावलीतही पाप वाटते तेंव्हा तुझ्या घरी कसा येवू?" गणिका म्हणाली, " आपली इच्छा! परंतु ब्राह्मणाला दक्षिणा देणे हे मोठे पुण्याचे काम आहे आणि दारी आलेल्याला तर दक्षिणा दिल्याशिवाय मी जावू देणार नाही!" असे म्हणून तिने राजगुरुना सोन्याच्या दोन मोहोरा दिल्या. मोहोरा पाहून राजगुरू नरम झाले. तिच्या घरी आले, जेंव्हा तिने पाणी दिले तेंव्हा त्यांनी ते नाकारले पण तिने चार मोहोरा दिल्या तेंव्हा त्यांनी पाणीही पिले आणि अश्याच रीतीने जेवणही केले. तेंव्हा गणीकेने राजगुरुना सुनावले, "पापाचा जनक कोण असतो याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले का?, तर पापाचा जनक आहे लोभ." राजगुरू निरुत्तर झाले पण त्यांना राजाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.      

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »