दैनिक परिपाठ
30 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
जीभ जिंकणारा जग जिंकतो.
🔺️ दिनविशेष
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : खळखळ करणे-अर्थ : नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.
▪️वाक्य : ताटात कारल्याची भाजी वाढली की, मोहन आईपाशी खळखळ करतो.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : तट्टाला टुमणी तेजीला इशारत
▪️अर्थ : जी गोष्ट मूर्खाला शिकवून समजत नाही ती शहाण्याला इशाऱ्याने समजते.
🔺️ कोडे
अशी कोणती गोष्ट आहे, जी तोडल्याशिवाय वापरता येत नाही?
उत्तर - अंडे
🔺️ सामान्यज्ञान
१. 'वंदे मातरम' या गीताचे रचनाकार कोण आहेत?
उत्तर - बंकीमचंद्र चटर्जी
२. 'वंदे मातरम' हे गीत कोणत्या प्रसिद्ध कादंबरीचा भाग आहे?
उत्तर - आनंदमठ
३. 'वंदे मातरम' मूळतः कोणत्या भाषेत रचले गेले आहे?
उत्तर - संस्कृत आणि बंगाली
४. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात हे गीत पहिल्यांदा गायले गेले?
उत्तर - १८९६ (कलकत्ता)
५. १८९६ च्या अधिवेशनात हे गीत पहिल्यांदा कोणी गायले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
🔺️ बोधकथा
खोटा पैसा
एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दु:ख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले ," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.
तात्पर्य - आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon