सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 05 March

 

दैनिक परिपाठ

05 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

🔺️ दिनविशेष 
१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.

१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

१९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.

२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : आत्मसात करणे- मिळवणे, अंगात मुरवणे. 

▪️वाक्य : मुग्धाने बालवयातच संगीतातील सर्व राग आत्मसात केले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : भरवशाच्या म्हशीला टोणगा 

▪️अर्थ  : पूर्ण निराशा करणे.

🔺️ कोडे 
▪️ खरेदी करताना काळा,जाळल्यावर सफेद.ओळखा पाहू मी कोण? 

▪️उत्तर - कोळसा

🔺️ सामान्यज्ञान 
1) भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?
उत्तर  - लोणार
2) भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…... म्हणून ओळखला जातो?
उत्तर - अरबी समुद्र
3) रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर
 केला जातो ?
उत्तर -  रेडिओ
4) महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली ?
उत्तर - 2007
5) 'दादासाहेब फाळके' पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
उत्तर - चित्रपट


🔺️ बोधकथा

                 कष्टाची कमाई
ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे नित्याचे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे.
 
एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की सून जे म्हणते आहे त्याची परीक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायाला लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले.

काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खुश झाला. आता त्याचा सूनबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला की इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानीचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खुश होवून त्या मच्छिमारांना चांगले बक्षीस दिले व सुनेला शाबासकी दिली.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »