दैनिक परिपाठ
04 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
🔺️ दिनविशेष
१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९७४: पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : आडाखे बांधणे- मनात आराखडा किंवा अंदाज करणे.
▪️वाक्य : जमीन घेतल्यावर घर कसे बांधायचे, याचे महेशने मनाशी आडाखे बांधले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : डोंगर पोखरून उंदीर कढणे
▪️अर्थ : जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
🔺️ कोडे
▪️ जगभर मी फिरतो, पण जमिनीवर ठेवत नाही पाय, दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो, रात्र आहे काळोखी माझ्याशिवाय.ओळखा पाहू मी कोण?
▪️उत्तर- चंद्र
🔺️ सामान्यज्ञान
1) 'जाया' शब्दाचा समानार्थी शब्द
खालीलपैकी कोणता?
उत्तर - पत्नी
2) दोन नद्यांमधील प्रदेशास काय
म्हणतात ?
उत्तर - दुआब
3) पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?
उत्तर - तेलबिया
4) KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप
सांगा?
उत्तर - know your customer
5) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
उत्तर - नागपूर
🔺️ बोधकथा
सावकाराचे खोटे
एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले, "ही गाय तू कुठून आणली आहे? " शेतकरी म्हणाला," ही गाय मी खरेदी केली आहे." पंचानी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचानी सावकाराला विचारले, हि गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने पंचांना सांगितले," ही गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे." पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,'' ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon