सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 35

ज्ञानकुंभ - 35    
'ळी' या अक्षराने संपणारा दोन अक्षरी शब्द शोधा.
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ बुधवार दिनांक 04/03/2026

उपक्रम : 'ळी' या अक्षराने संपणारा दोन अक्षरी शब्द शोधा.

🔺️ प्रश्नसूची

१)फूल उमलण्याआधीची अवस्था - 

२)पिकावर पडणारी  किड -- 

३)गालावर पडणारा खड्डा --

४)ऊसापासून साखर बनवल्यावर उरते- 

५) बंदूकीला असते --

६) पंचपात्राची सोबतीण --

७) एका हाताने वाजत नाही -- 

९) बागेचा देखभाल करतो --

१०) भांड्याचा एक प्रकार -- 

११) तूर /मुगाच्या करतात --

१२) करवंदांची असते -- 

१३) भाजी चिरण्यासाठी वापरतात --

१४) फाल्गुन महिन्यातील एक सण - 

१५)आठ पाय असलेला किडा -

१६) भिक्षा मागण्यासाठी उपयोगी -

१७) चोरांची/ दरोडेखोरांची --  

१८) होळी सणाला केला जाणारा पदार्थ - 

१९) लाकडाची बांधतात --

२०) पुस्तकात शब्दांच्या असतात --

२१)फांद्या नसलेली वनस्पती -

२२) एक पाळीव प्राणी --  

२३)एकत्र जन्माला आलेली -- 

२४) साडी सोबत असते --

🔺️ उत्तरसूची 

१)फूल उमलण्याआधीची अवस्था - कळी

२)पिकावर पडणारी  किड -- अळी

३) गालावर पडणारा खड्डा --खळी

४)ऊसापासून साखर बनवल्यावर उरते- मळी

५) बंदूकीला असते --नळी

६) पंचपात्राची सोबतीण --पळी

७) एका हाताने वाजत नाही --टाळी 

९) बागेचा देखभाल करतो --माळी

१०) भांड्याचा एक प्रकार - थाळी 

११) तूर / मुगाच्या करतात -डाळी

१२) करवंदांची असते - जाळी

१३)भाजी चिरण्यासाठी वापरतात - विळी

१४) फाल्गुन महिन्यातील एक सण- होळी

१५)आठ पाय असलेला किडा - कोळी

१६)भिक्षा मागण्यासाठी उपयोगी - झोळी

१७)चोरांची/ दरोडेखोरांची --  टोळी

१८) होळी सणाला केला जाणारा पदार्थ - पोळी 

१९) लाकडाची बांधतात - मोळी

२०) पुस्तकात शब्दांच्या असतात - ओळी

२१)फांद्या नसलेली वनस्पती -- केळी 

२२) एक पाळीव प्राणी - शेळी 

२३)एकत्र जन्माला आलेली - जुळी

२४) साडी सोबत असते - चोळी

Previous
Next Post »