सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 30 April

   

दैनिक परिपाठ

30 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.

🔺️ दिनविशेष 
१९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  डोळ्यांत धारा लागणे - अर्थ : अश्रू वाहणे, रडणे.

▪️वाक्य : विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेताना भक्तिभावाने रामरावांच्या डोळ्यांत धारा लागल्या.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : आधी पोटोबा मग विठोबा

▪️अर्थ  : पहिले पोट भरणे नंतर देवाचे पूजन करणे.

🔺️ कोडे 
▪️ गर्मी किंवा थंडीमध्येही थंडच राहते.   

▪️उत्तर - बर्फ

🔺️ सामान्यज्ञान 
१). तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाचे
वैशिष्ट्य कोणते होते?
उत्तर -  भजन
२). 'होमो सेपियन' मानवाला युरोपमध्ये
कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर - क्रोमॅनॉन
३) मुले - मुली असा भेदभाव न करणे
म्हणजे काय?
उत्तर - समानता
४) दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणे म्हणजे काय?
उत्तर - सहिष्णुता
५) नारळाचा बीजप्रसार कसा होतो?
उत्तर - पाण्यामार्फत
🔺️ बोधकथा
           बुद्धीचे बळ
एका जंगलात एक वृद्ध सिंह राहायचा. तो म्हातारा झाल्यामुळे त्याला आता पूर्वीसारखी शिकार करता येत नव्हती. त्याने एक युक्ती केली. तो गुहेत पडून राहायचा आणि जो प्राणी जवळून जाईल, त्याला सांगायचा की, "मी खूप आजारी आहे, मला वाचवा." दया दाखवून जो कोणी गुहेत जायचा, सिंह त्याला मारून खायचा.

​एके दिवशी एक चतुर कोल्हा त्या गुहेजवळ आला. त्याला सिंहाचा संशय आला. तो गुहेच्या दाराशीच उभा राहिला आणि बाहेरूनच म्हणाला, "सिंहराज, आपली प्रकृती कशी आहे?"

​सिंह गुहेच्या आतूनच म्हणाला, "मित्रा, मी खूप अशक्त झालो आहे. तू आत का येत नाहीस? आपण गप्पा मारूया."

​कोल्हा खूप हुशार होता. त्याने गुहेच्या बाहेर जमिनीवरील पावलांच्या ठशांचे नीट निरीक्षण केले आणि हसून म्हणाला, "महाराज, मला आत यायला आवडले असते, पण मी पाहतोय की तुमच्या गुहेत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे तर दिसत आहेत, पण बाहेर येणाऱ्या एकाही प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसत नाहीत!"

​हे बोलून कोल्हा तिथे न थांबता लगेच पळून गेला आणि त्याचे प्राण वाचले.

तात्पर्य - संकट कितीही मोठे असले तरी घाबरून न जाता, आपल्या बुद्धीचा आणि निरीक्षणाचा वापर केला तर संकटातून मार्ग काढता येतो.         

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »