सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 79

     

ज्ञानकुंभ - 79
क्रियाविशेषण अव्यय शोधा. 

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

❇️ गुरुवार दिनांक 30 /04/2026

उपक्रम : क्रियाविशेषण अव्यय शोधा. 

🔺️प्रश्नसूची 

१. तो हळूहळू चालतो.

उत्तर - ------------

२. सूर्य दररोज उगवतो.

उत्तर - -----------

३. मुलगा तिथे बसला आहे.

उत्तर - --------------

४. गाणे अतिशय गोड आहे.

उत्तर - --------------

५. तो पुन्हा पुन्हा तेच बोलतो.

उत्तर - --------------

६. पक्षी वर उडाला.

उत्तर - -------------

७. गाडी वेगाने धावते.

उत्तर - --------------

८. आम्ही उद्या गावाला जाऊ.

उत्तर - ----------------

९. त्याने मुद्दाम काच फोडली.

उत्तर - ------------------

१०. पाऊस धो-धो पडत आहे.

उत्तर - ------------------

🔺️उत्तरसूची

१. तो हळूहळू चालतो.

उत्तर - हळूहळू 

(चालण्याची रीत सांगितली आहे.)

​२. सूर्य दररोज उगवतो.

उत्तर - दररोज 

(क्रिया केव्हा घडते ते सांगितले आहे.)

​३. मुलगा तिथे बसला आहे.

उत्तर - तिथे

(क्रियेचे स्थळ दर्शवले आहे.)

​४. गाणे अतिशय गोड आहे.

उत्तर - अतिशय 

(परिमाण किंवा प्रमाण दर्शवले आहे.)

​५. तो पुन्हा पुन्हा तेच बोलतो.

उत्तर - पुन्हा पुन्हा 

(क्रियेची आवृत्ती सांगितली आहे.)

६. पक्षी वर उडाला.

उत्तर - वर

(दिशा किंवा स्थान दर्शवले आहे.)

​७. गाडी वेगाने धावते.

उत्तर - वेगाने 

(धावण्याची पद्धत सांगितली आहे.)

​८. आम्ही उद्या गावाला जाऊ.

उत्तर - उद्या 

(वेळ किंवा काळ दर्शवला आहे.)

​९. त्याने मुद्दाम काच फोडली.

उत्तर - मुद्दाम 

(हेतू किंवा रीत सांगितली आहे.)

​१०. पाऊस धो-धो पडत आहे.

उत्तर - धो - धो

(पडण्याची रीत/प्रकार सांगितला आहे.)

Newest
Previous
Next Post »