📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.65
महाराष्ट्र दिन
📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा.
🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई
मी बालकवी पियुष गांगुर्डे.१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त केलेली कविता नक्की वाचा.
🚩माझा महाराष्ट्र
काय सांगू माझ्या
महाराष्ट्राची महती
मावळ्यांच्या रक्तान
अन् शेतकऱ्यांच्या घामान
पावन झालेली ही माती
चोहो दिशांना पसरली
माझ्या महाराष्ट्राची ख्याती
इथे घडल्या बहिणाबाई
जनाबाई सखूबाई
शेकडो वर्षांनी
महाराष्ट्राला तख्त मिळवून
देणाऱ्या जिजाबाई
शंभूराजांच दुःख विसरून
स्वराज्य लढवणाऱ्या येसूबाई
इथेच घडला
दिल्लीच्या तख्ताला
घाम फोडणारा
राजा शिवाजी
असंख्य यातना सोसून
स्वराज्यापायी इमान
राखणारा राजा संभाजी
मुघलांच्या फौजेत घुसून
तंबूचा कळस
आणणारा संताजी
इथेच घडले तुकोबाराय
नामदेव ज्ञानेश्वर माऊली
अवघ्या महाराष्ट्राला दिली
त्यांनी भक्तीची सावली
नवऱ्यासाठी देवाशी
भांडण करणारी
तुकोबारायांची आवली
इथेच घडले
डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
ज्यांनी दिले संविधान
इथेच घडले टिळक
ज्यांनी तुरुंगात केले
गितारहस्याचे लिखाण
इथेच घडले राजगुरु
ज्यांनी राष्ट्रसेवेसाठी
वेचिले प्राण
इथे आहेत
भीमा गोदावरी इंद्रायणी
बळीराजाच्या शेतास
देतात पाणी
माझ्या बळीराजाच शेत
जणू सोन्याच्या खाणी
इथे आहेत
दूग्धव्यवसायावर छाप
पाडणारे काका चितळे
हे उद्योगपती
इथेच आहेत
मुकेश अंबानी
ज्यांनी रिलायंस जिओ
दिले जगासाठी
इथे आहेत
नाशिकची द्राक्षे
संत्री नागपूरची
चिकू घोलवडचे
अन् केळी जळगावची
रत्नागिरीचा आंबा
स्ट्राॕबेरी महाबळेश्वरची
इथेच आहे
विदर्भाची वर्हाडी
खानदेशची अहिराणी
कोकणची कोकणी
अन् मालवणची मालवणी
कुठलीही भाषा घ्या
आहेच ती मंजुळवाणी
इथेच किल्लेही प्रसिद्ध
आहेत पर्यटनात
भंडारदरा वेरूळ अजिंठा
महाबळेश्वरही
करतील जागा मनात
चला तर मग
फिरायला या महाराष्ट्रात
इथे आहे
शिक्षण शाळा
हिच परंपरा
फुले शाहू सावित्रीने
पोहचविले हे घराघरा
बालकवी पियुष चंद्रकांत गांगुर्डे
इयत्ता ७ वी
जनता विद्यालय पवननगर,नाशिक
👉 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व आणि महाराष्ट्राचा वारसा अधोरेखित करणारी ही खास 'महाराष्ट्र दिन' प्रश्नमंजुषा.
🔶️ महत्त्वाची सूचना :
👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.
👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर प्राप्त होतील.
👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल.
👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.
👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावा. वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411
📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?
▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.
▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.
▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.
▶️ Certificate वर Click करा. कोणत्याही Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.
▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.
▶️ Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.
▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.
▶️ Social Media वर Share करा,Print काढा
✍प्रश्नमंजुषा

ConversionConversion EmoticonEmoticon