सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 78

     

ज्ञानकुंभ - 78
शब्दयोगी अव्यय शोधा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

❇️ बुधवार दिनांक 29/04/2026

उपक्रम : शब्दयोगी अव्यय शोधा.

🔺️प्रश्नसूची 

१. पुस्तक टेबलावर आहे.

​उत्तर: ---------------

​२. शाळेसमोर मोठी बाग आहे.

​उत्तर:  --------------

​३. मुले झाडाखाली बसली आहेत.

​उत्तर:   -----------------

​४. सूर्य ढगांमागे लपला.

​उत्तर: -----------------

​५. माझ्या घरापाशी मंदिर आहे.

​उत्तर: -----------------

​६. जेवणापूर्वी हात धुवावेत.

​उत्तर: -------------------

​७. त्याने मित्रासाठी भेटवस्तू आणली.

​उत्तर: -------------------

​८. नदीच्या पलीकडे डोंगर आहे.

​उत्तर: --------------------

​९. पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा आहे.

​उत्तर: --------------------

​१०. प्रगतीशिवाय सुख मिळत नाही.

​उत्तर: -------------------

🔺️उत्तरसूची 

१. पुस्तक टेबलावर आहे.

उत्तर: वर

२. शाळेसमोर मोठी बाग आहे.

उत्तर:  समोर 

३. मुले झाडाखाली बसली आहेत.

उत्तर:  खाली

४. सूर्य ढगांमागे लपला.

उत्तर: मागे

५. माझ्या घरापाशी मंदिर आहे.

उत्तर: पाशी

६. जेवणापूर्वी हात धुवावेत.

उत्तर: पूर्वी 

७. त्याने मित्रासाठी भेटवस्तू आणली.

उत्तर: साठी

८. नदीच्या पलीकडे डोंगर आहे.

उत्तर: कडे

९. पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा आहे.

उत्तर: मुळे

१०. प्रगतीशिवाय सुख मिळत नाही.

उत्तर: शिवाय

Newest
Previous
Next Post »