सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 29 April

   

दैनिक परिपाठ

29 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.

🔺️ दिनविशेष 
१९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.

१९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.

१९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

२००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.

२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :   डोळ्यांत तेल घालून राहणे-अर्थ : सावध राहणे.

▪️वाक्य : भारतीय सैन्य सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा करते.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : कामापुरता मामा 

▪️अर्थ  : स्वार्थासाठी गोड बोलणे.

🔺️ कोडे 
▪️ कोणत्या आविष्कारामुळे आपण बाहेरील बघू शकतो? 

▪️उत्तर - खिडकी

🔺️ सामान्यज्ञान 
१) कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतून
वाहणारी नदी कोणती?
उत्तर - कावेरी
२) हैदराबाद शहराचे जुने नाव सांगा.
उत्तर - भाग्यनगर
३) ध्यानचंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त
कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर -  राष्ट्रीय क्रीडा दिन
४) एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक
 कोण?
उत्तर - नरेंद्र मोदी
५) तंबाखूचे उत्पादन कोणत्या राज्यात
जास्त प्रमाणात घेतले जाते?
उत्तर - आंध्र प्रदेश
🔺️ बोधकथा

मेहनतीचा घाम आणि सोन्याची नाणी

एका गावात एक अतिशय श्रीमंत पण कष्टाळू शेतकरी होता. त्याचा मुलगा मात्र अत्यंत आळशी होता. त्याला वाटायचे की वडिलांकडे खूप संपत्ती आहे, मग कष्ट कशाला करायचे?

​एके दिवशी वडिलांनी मुलाला बोलावले आणि म्हणाले, "आज जर तू स्वकष्टाने एक रुपया कमावून आणला नाहीस, तर तुला रात्रीचे जेवण मिळणार नाही."

​मुलगा रडत आपल्या आईकडे गेला. आईला दया आली आणि तिने स्वतःचा एक रुपया मुलाला दिला. संध्याकाळी मुलाने तो रुपया वडिलांना दिला. वडील म्हणाले, "हा रुपया विहिरीत फेकून दे." मुलाने तो लगेच फेकून दिला. वडिलांना समजले की हा रुपया त्याने कमावलेला नाही.

​दुसऱ्या दिवशी वडिलांनी आईला माहेरी पाठवून दिले. आता मुलाला बहिणीने रुपया दिला. तोही त्याने विहिरीत फेकला, कारण त्यात त्याचे कष्ट नव्हते.

​तिसऱ्या दिवशी मात्र त्याला कोणीच पैसे देणारे नव्हते. तो बाजारात गेला आणि एका व्यापाऱ्याचे ओझे उचलण्याचे काम केले. घामाने डबडबलेल्या अवस्थेत त्याला कष्ट करून एक रुपया मिळाला. संध्याकाळी तो रुपया त्याने वडिलांना दिला. वडील पुन्हा म्हणाले, "जा, हा रुपया विहिरीत फेकून दे."

​यावेळी मात्र मुलगा चिडला आणि म्हणाला, "बाबा, हा रुपया फेकण्यासाठी मी दिवसभर उन्हात घाम गाळला आहे, माझे हात-पाय दुखत आहेत. हा मी विहिरीत फेकणार नाही!"

​वडील हसले आणि म्हणाले, "हेच मला तुला शिकवायचे होते. जेव्हा कष्ट आपले असतात, तेव्हाच आपल्याला पैशाची खरी किंमत कळते."

तात्पर्य: कष्टाशिवाय मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते; स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली गोष्टच माणसाला स्वाभिमान आणि समाधान देते

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »