ज्ञानकुंभ - 77
उभयान्वयी अव्यय लिहा.
❇️ मंगळवार दिनांक 28/04/2026
उपक्रम : उभयान्वयी अव्यय लिहा.
🔺️प्रश्नसूची
१) विजा चमकू लागल्या -- पावसाला सुरुवात झाली.
२) तुला चहा हवा -- कॉफी?
३) त्याने खूप अभ्यास केला,--त्याला कमी गुण मिळाले.
४) लोकमान्य टिळक म्हणाले ---, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे."
५) आज सुट्टी आहे, ---- मी खेळायला जाईन.
६) शरीर सुदृढ राहावे, --- व्यायाम करावा.
७) त्याने खूप धावपळ केली, -- त्याची गाडी चुकली.
८) तू वेळेवर आलास ----आपण बागेत जाऊ.
९) परीक्षेत यश मिळावे ---त्याने खूप मेहनत घेतली.
१०) अजय ---विजय यांपैकी एक जण येईल.
🔺️उत्तरसूची
१) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
२) तुला चहा हवा की कॉफी?
३) त्याने खूप अभ्यास केला, पण त्याला कमी गुण मिळाले.
४) लोकमान्य टिळक म्हणाले की,"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे."
५) आज सुट्टी आहे, म्हणून मी खेळायला जाईन.
६) शरीर सुदृढ राहावे, यास्तव व्यायाम करावा.
७) त्याने खूप धावपळ केली, परंतु त्याची गाडी चुकली.
८) तू वेळेवर आलास तर आपण बागेत जाऊ.
९) परीक्षेत यश मिळावे याकरिता त्याने खूप मेहनत घेतली.
१०) अजय किंवा विजय यांपैकी एक जण येईल.

ConversionConversion EmoticonEmoticon