दैनिक परिपाठ
28 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.
🔺️ दिनविशेष
१९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.
१९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
१९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
२००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : डोळ्यांत तेल घालून राहणे-अर्थ : सावध राहणे.
▪️वाक्य : भारतीय सैन्य सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा करते.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : कामापुरता मामा
▪️अर्थ : स्वार्थासाठी गोड बोलणे.
🔺️ कोडे
▪️ कोणत्या अविष्कारामुळे आपण बाहेरील बघू शकतो?
▪️उत्तर - खिडकी
🔺️ सामान्यज्ञान
१) कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतून
वाहणारी नदी कोणती?
उत्तर - कावेरी
२) हैदराबाद शहराचे जुने नाव सांगा.
उत्तर - भाग्यनगर
३) ध्यानचंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त
कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय क्रीडा दिन
४) एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक
कोण?
उत्तर - नरेंद्र मोदी
५) तंबाखूचे उत्पादन कोणत्या राज्यात
जास्त प्रमाणात घेतले जाते?
उत्तर - आंध्रप्रदेश
🔺️ बोधकथा
कष्टाळू हरिण
एका राज्यात एक राजा राहत असतो. त्या राजाला प्राण्यांचे मांस खायला आवडत असते. म्हणून तो रोज हरणांची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जात असतो. त्यामुळे त्यामुळे रोज एका हरणाला आपला जीव गमवावा लागलेला असतो.
एक दिवस हरणांचा कळपाचा प्रमुख त्या राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो ‘महाराज आपण रोज एका हरणाला खाता त्यामुळे दररोज एक हरणाला आपला प्राण गमवावा लागत आहे तर कृपा करून असे करू नका, तुम्ही त्यांची शिकार करू नका.’ त्यावर राजा म्हणतो कि,’हे बघताना मला ते काय जमणार नाही मला रोज हरिन लागते त्यामुळे तू मला रोज एक हरीण पाठवून देत जा. नाहीतर तुझ्यावर तुझ्या हरणाचा जीव धोक्यात आहेत’.
हरणांचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो कि,’नका करू प्राण्याची हत्त्या !’. पण राजा ऐकायला तयार होत नाही. तो म्हणतो तू जर ऐकत नाहीस तर मी आता तुझे प्राण घेणार.’ हरणांचा प्रमुख स्वतःच्या जीवाची पर्वा म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होते.
हे ऐकून राजा हरणांच्या प्रमुखावर खुश होतो. राजा हरणाच्या प्रमुखाला वचन देतो कि मि तुला कधीच मारणार नाही. आता रोज एक हरीण स्वत:हून राजासमोर हजर होऊ लागले. असे अनेक दिवस चालू राहते.
एक दिवस एका हरिणीचा दिवस येतो. तिला एक छोटे पिल्लू असते. ती हरणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते. ती सांगते कि ‘महाराज मला माझ्या पिल्लाला वाढवायचे आहे. त्याचे संगोपन करायचे आहे. जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालनपोषण कोण करणार? मोठे झाल्यावर माझ्या पिल्लाला तर राजाला कडेच पाठवायचे आहे यात राजाचे नुकसान आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवून द्या’ हरणाचा प्रमुख ठरवतो कि आज तो स्वत: राजाकडे जाणार.
त्या हरिणीच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो. हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो. राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते. तो राजा त्या हरणाला म्हणतो मित्रा मी आतापर्यंत तुमच्या कळपा मधील अनेक जणांचा जीव घेतला मला फार दुःख होत आहे मला माझी चुक समजली. राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो,’ माझ्या मित्र यापुढे मी कोणत्याच हरणाचे शिकार करणार नाही.’
तात्पर्य – नेहमी दुसऱ्यांना मदत करावी. कधीही कोणाला त्रास देऊ नये.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon