ज्ञानकुंभ - 76
क्रियाविशेषण अव्यय आणि प्रकार ओळखा.
❇️ दिनांक /04/2026
उपक्रम : क्रियाविशेषण अव्यय आणि प्रकार ओळखा.
🔺️प्रश्नसूची
१ सूर्य सकाळी उगवतो.
उत्तर - -----------------------
२ कासव हळूहळू चालते.
उत्तर ------------------------
३ परमेश्वर सर्वत्र आहे.
उत्तर -------------------------
४ तो मुलगा जोरात ओरडला.
उत्तर --------------------------
५ आम्ही परवा सहलीला जाऊ.
उत्तर -------------------------
६ आईने थोडा भात वाढला.
उत्तर ------------------------
७ शाळा घराच्यासमोर आहे.
उत्तर -------------------------
८ ती नेहमी अभ्यास करते.
उत्तर -----------------------
९ डोंगर पलीकडे आहे.
उत्तर ------------------------
१० वाघ अचानक समोर आला.
उत्तर ------------------------
🔺️उत्तरसूची
१ सूर्य सकाळी उगवतो.
उत्तर - सकाळी - कालवाचक
२ कासव हळूहळू चालते.
उत्तर - हळूहळू - रीतिवाचक
३ परमेश्वर सर्वत्र आहे.
उत्तर - सर्वत्र - स्थलवाचक
४ तो मुलगा जोरात ओरडला.
उत्तर - जोरात - रीतिवाचक
५ आम्ही परवा सहलीला जाऊ.
उत्तर - परवा - कालवाचक
६ आईने थोडा भात वाढला.
उत्तर - थोडा - परिमाणवाचक (संख्यावाचक)
७ शाळा घराच्या समोर आहे.
उत्तर - समोर - स्थलवाचक
८ ती नेहमी अभ्यास करते.
उत्तर - नेहमी - कालवाचक (सातत्यदर्शक)
९ डोंगर पलीकडे आहे.
उत्तर - पलीकडे - स्थलवाचक
१० वाघ अचानक समोर आला.
उत्तर - अचानक - रीतिवाचक

ConversionConversion EmoticonEmoticon