दैनिक परिपाठ
27 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
🔺️ दिनविशेष
१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
१९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.
१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.
२००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : डोळ्याला डोळा न भिडवणे-अर्थ : घाबरून नजर न देणे.
▪️वाक्य : उशिरा घरी आलेल्या समीरने बाबांच्या डोळ्याला डोळा भिडवला नाही.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : रात्र थोडी सोंगे फार
▪️अर्थ : कमी वेळात जास्त काम करणे.
🔺️ कोडे
▪️ एक पाच अक्षरी पदार्थ, पहिली 3 अक्षरे एका फुलाचे नाव, शेवटचे आणि 4 थे अक्षर मौज, पहिले दुसरे आणि शेवटचे अक्षर नोकर….???
▪️उत्तर - गुलाबजाम
🔺️ सामान्यज्ञान
१) राफेल लढाऊ विमानाचे उड्डाण करणारी पहिली महिला कोण?
उत्तर - अवनी चतुर्वेदी
२) भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली काय
लिहिलेले असते?
उत्तर - सत्यमेव जयते
३) जालियनवाला बाग हत्याकांड कोठे
घडले?
उत्तर - अमृतसर
४) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा
घडले?
उत्तर -13 एप्रिल 1919
५) सर्वात जास्त लोकसंख्या असलेला
केंद्रशासित प्रदेश कोणता?
उत्तर - दिल्ली
🔺️ बोधकथा
खरा पुत्र
तीन स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात, मान डूगडुगते तिघींची, वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते, तीही त्यांना सामील होते, गप्पा सुरु होतात, बायकाच त्या!
साहजिक गोष्ट मुलांवर येते, तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे, संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही, त्याने भल्याभल्याना पाणी पाजलं आहे! एवढ्यात तो मुलगा समोरून येतो, मोठमोठ्याने वेदमंत्र अस्खलित संस्कृतात उच्चरत, यांना अभिवादन करून पुढे जातो. त्याची आई म्हणते हाच कि माझा मुलगा!
दुसरी म्हणते, माझ्या मुलाच्या पहिलवानी डावपेचाला तोड देणारा पंचक्रोशीत कोण नाही, त्याच्या सुंदर आणि धष्टपुष्ट शरीरावर तरुणी भुलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून असतात, तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो, चौघीना प्रणाम करतो, नजर खिळवून बसलेल्या तरुणींकडे बघत मिशिवर पीळ देत मिश्किल हसतो व पुढे जातो.
आता तिसऱ्या स्त्रीची गोष्ट, इतर दोघी तिच्याकडे कुत्सितपणे बघत असतात, ती म्हणते माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत, चारचौघांसारखा आहे तो. अरे, हा काय समोरून येतोय. तो मुलगा येताच आईच्या डोईवरचे जड मडके उचलून आपल्या खांद्यावर घेतो, आईला लाडिक रागावतो की का गेलीस पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन! तो मडके घेऊन घरी जातो.
इतका वेळ चौथी स्त्री गप्प आहे हे पाहून पहिली स्त्री म्हणते, काय गं, मग आमच्या तिघीपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम वाटला, दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तिसरी साहजिक नाराज होती.
ती चौथी स्त्री म्हणाली, "तिघींपैकी? मला तर फक्त एकीचाच 'मुलगा' दिसला, जो आता आईच्या डोक्यावरचे मडके घेऊन गेला"
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon