सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 06 April

 

दैनिक परिपाठ

06 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.

🔺️ दिनविशेष 
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.

१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

१९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.

२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :   गुण्यागोविंदाने राहणे - अर्थ : प्रेमाने एकत्र राहणे. 

▪️वाक्य : शीला व मीना एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाच्या असूनही घरात गुण्यागोविंदाने राहतात.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : शेरास सव्वाशेर .

▪️अर्थ  : प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

🔺️ कोडे 
▪️ समुद्रात जन्म घेणारा; पण घरात राहणारी कोण?

▪️उत्तर - शंख 

🔺️ सामान्यज्ञान 
१) राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
 उत्तर : 9 नोव्हेंबर 2019
२) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण
कोठे आढळला?
 उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे
३) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
 उत्तर : केरळ
४) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय
कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश
५) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर
🔺️ बोधकथा
                सत्संगाचा परिणाम
एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते. वडिलांनी खूप चो-या केल्या होत्या. त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि ''काय वाटेल ते होऊ दे पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको'' असा मुलाला उपदेश केला. त्यांनी मग प्राण सोडले. मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला पण त्यामागील कारण त्याला कळले नाही. एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोश्याला लपला. त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते. प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती. त्यातील एकाच वाक्य ह्याचा नकळत कानावर पडले. ते म्हणजे ''देवांची सावली पडत नाही''. ह्याने ते मुद्दाम ऐकले नव्हते तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले. नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. बरेच दिवस खूप त्रास देवूनही, खुप मार खावूनही याने गुन्हा कबूल केला नाही तेंव्हा राजा चिंतीत झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले. एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचविला. तो म्हणाला हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बधत नाही तेंव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेवू. मग एका सुंदर स्त्रीला खुपसे दागदागिने घालून देवीच्या रुपात सजविण्यात आले आणि ह्याच्या समोर पाठविण्यात आले. तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्री वर पाडण्यात आला. चोराने पाहिले एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे. पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील ''देवांची सावली पडत नाही'' हे वाक्य आठवले आणि त्याचा समोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली.त्याच बरोबर त्याला कळले कि ही देवी नाही माणूस आहे , तरी त्याला कळून चुकले आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला. मग ही लुटमार कशाला? चोरी कशाला? त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला.

तात्पर्य- चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »