दैनिक परिपाठ
05 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
🔺️ दिनविशेष
१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
२०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : गट्टी जमणे-अर्थ : दोस्ती होणे.
▪️वाक्य : गावी आलेल्या मालूची गावातल्या शालूशी चांगली गट्टी जमली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : विचाराची तूट तेथे भाषणाला उत
▪️अर्थ : मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते.
🔺️ कोडे
▪️ पत्ता शोधतो, पत्र वाटतो, सकाळ असो की दुपार. मी कोण?
▪️उत्तर - पोस्टमन
🔺️ सामान्यज्ञान
१) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम
२)आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान
३)भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016
४) पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019
५)जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5-8-2019 रोजी
🔺️ बोधकथा
कवी
उज्जैन येथे एकदा खूप पाउस पडत होता. सारे शहर झोपले होते. मात्र राजवाड्याचा द्वारपाल मातृगुप्त जागाच होता. तो पहारा देत आपल्या दुर्भाग्याचा विचार करत होता. कारण तो एक असाधारण काव्यप्रतीभेचा धनी होता. राजा विक्रमादित्य गुणीजनांचा सन्मान करतो हे ऐकून तो येथे आला होता. परंतु राजाची त्याची भेट झाली नसल्याने त्याला द्वारपालाचे काम करावे लागत होते. त्याच रात्री भर पावसात राजा विक्रमादित्य गुप्त वेशात राज्यात पाहणी करावयास निघाले होते. द्वारावर येताच त्यांच्या कानी कुणीतरी काहीतरी गुणगुणल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी थांबून ऐकले तर मातृगुप्त एक कविता म्हणत होता. त्यांनी त्याला विचारले अरे तू आता पहाऱ्यावर आहे ना? मग हि कविता कोणाची म्हणतोस? त्याने उत्तर दिले, हि कविता माझी आहे आणि या कवितेत मी राज्याची परिस्थिती वर्णन केली आहे. राजे तिथून काहीच न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मातृगुप्ताला दरबारात बोलावले व त्याच्या हाती एक पत्र देत त्याला काश्मीरला जायला सांगितले. मातृगुप्ताने फारशी चौकशी न करता ते पत्र घेवून काश्मीरला प्रयाण केले. काश्मीरला पोहोचताच तेथील पंतप्रधानांनी ते पत्र वाचून पाहिले व मातृगुप्ताला काश्मीरचा राजा म्हणून घोषित केले. या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राजांनी तुझ्या कर्तव्य बुद्धी बरोबरच तुझी राष्ट्रनिष्ठा व काव्यप्रतिभा पाहिली म्हणून त्यांनी तुला येथील राजा केले आहे.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon