सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 04 April

  

दैनिक परिपाठ

04 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
मनस्थिती बदला ; परिस्थिती बदलेल.

🔺️ दिनविशेष 
१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.

१९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.

१९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :   गाण्याला धार येणे-अर्थ : गाणे उत्कृष्ट होणे. 

▪️वाक्य : जीव ओतून गायल्यामुळे लतादीदींच्या गाण्याला धार आली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : वरातीमागून घोडे 

▪️अर्थ  : योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.

🔺️ कोडे 
▪️ चाक फिरवतो गरागरा , 
मडकी करतो भराभरा !  
▪️उत्तर - कुंभार 

🔺️ सामान्यज्ञान 
 १) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
 उत्तर : आसाम
२) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य
कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश
३) जागतिक कविता दिन केव्हा पासून साजरा केला जातो?
 उत्तर: 21 मार्च 1999
४) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क
कोणते?
उत्तर : उत्तराखंड
५) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती
🔺️ बोधकथा
             चिखलातील कमळ
एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे खूप संपत्ती होती, पण त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. तो नेहमी गरिबांना तुच्छ लेखायचा.

एके दिवशी तो व्यापारी एका संतांकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, तरीही मला शांती मिळत नाही. लोक माझ्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. मी काय करू?"

संतांनी त्याला बागेत नेले. तिथे एका बाजूला स्वच्छ पाण्याचे कारंजे होते आणि दुसऱ्या बाजूला एक छोटासा चिखलाचा डबका होता. त्या चिखलात एक सुंदर कमळ फुलले होते.

संतांनी विचारले, "तुला काय दिसतंय?"
व्यापारी म्हणाला, "महाराज, तो घाणेरडा चिखल आणि त्यातलं ते सुंदर फूल."

संत हसून म्हणाले, "हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे कमळ चिखलात जन्मलं, पण त्याने चिखलाची घाण स्वतःला लावून घेतली नाही. उलट, त्याने स्वतःचं सौंदर्य आणि सुगंध सगळ्यांना दिला. म्हणूनच लोक चिखलाचा तिरस्कार करतात, पण कमळाला देवासमोर ठेवतात."

तात्पर्य : माणूस कोणत्या परिस्थितीत जन्माला आला किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा, त्याचा स्वभाव आणि वागणूक कशी आहे यावरच त्याची किंमत ठरते. गर्वाचा त्याग करून दुसऱ्यांशी प्रेमाने वागल्यास जगात मान मिळतो.      

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »