ज्ञानकुंभ - 58
'ळी'कारांत शब्द लिहा.
🔶️ संकलित
❇️ शनिवार दिनांक 04/04/2026
उपक्रम : 'ळी'कारांत शब्द लिहा.
🔺️ प्रश्नसूची
प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर “ळी” आले पाहिजे.
1 हाताचे शेवटचे बोट ....
2 एक कडधान्य……
3 फणसातील बी….
4 कृत्रिम दात…..
5 केरळमध्ये राहणारा माणूस…
6 पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते..
7 प्राण्यांचे नाव..
8 आचमनासाठी वस्तू…
9 फाल्गुन महिन्यातील सण….
10 वाळलेली केळी….
11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा..
12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती…
13 सकाळी म्हणायचे भजन..
14 दोन्ही हातांनी वाजवतो ती…
15 भाजी चिरायचे साधन…
16 नारळाच्या झाडाची फांदी…
17 पायच्या बोटातील दागिना …
18 एक रंग….
19 संतांच्या हातातील वाद्य…
20 महाराष्ट्रातील एक जात…
21 डॉक्टरांचे औषध ..
22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली ..
23 पुरात न मोडणारे...
24 तीन ठिकाणची केलेली यात्रा …
25 फुल उमलण्यापूर्वीची अवस्था…
26 अनेक डाळींच्या पिठाचा घावणा...
27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात..
28 गव्हाच्या पिठाची करतात ती ...
29 पेशव्यांच्या कानातील दागिना…
30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती...
31 सण समारंभात दारात काढतो ती..
32 पूरण घालून करतो ती…
33 दिवाळीतील तिखट पदार्थ…
34 दूध घालतो ती..
35 बागकाम करणारा ..
36 दिव्यांचा सण ..
37 झाडाची पण खाते ती..
38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात ..
39 गालावर पडते ती..
40 प्रतिस्पर्ध्याची मात ..
🔺️ उत्तरसूची
1 हाताचे शेवटचे बोट...करंगळी
2 एक कडधान्य……चवळी
3 फणसातील बी….आठळी
4 कृत्रिम दात…..कवळी
5 केरळमध्ये राहणारा माणूस…केरळी
6 पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते...पागोळी
7 प्राण्यांचे नाव...कोळी
8 आचमनासाठी वस्तू…पळी
9 फाल्गुन महिन्यातील सण….होळी
10 वाळलेली केळी….सुकेळी
11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा...चाफेकळी
12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती…झोळी
13 सकाळी म्हणायचे भजन...भूपाळी
14 दोन्ही हातांनी वाजवतो ती…टाळी
15 भाजी चिरायचे साधन…विळी
16 नारळाच्या झाडाची फांदी…झावळी
17 पायच्या बोटातील दागिना …मासोळी
18 एक रंग….सोनसळी
19 संतांच्या हातातील वाद्य…चिपळी
20 महाराष्ट्रातील एक जात…कोळी
21 डॉक्टरांचे औषध ...गोळी
22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली ...मोळी
23 पुरात न मोडणारे...लव्हाळी
24 तीन ठिकाणची केलेली यात्रा …त्रिस्थळी
25 फुल उमलण्यापूर्वीची अवस्था…कळी
26 अनेक डाळींच्या पिठाचा घावणा...आंबोळी
27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात...चारोळी
28 गव्हाच्या पिठाची करतात ती ...पोळी
29 पेशव्यांच्या कानातील दागिना…भिकबाळी
30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती...आरोळी
31 सण समारंभात दारात काढतो ती...रांगोळी
32 पुरण घालून करतो ती…पुरणपोळी
33 दिवाळीतील तिखट पदार्थ…कडबोळी
34 दूध घालतो ती...गवळी
35 बागकाम करणारा ...माळी
36 दिव्यांचा सण ...दिवाळी
37 झाडाची पण खाते ती...अळी
38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात ...काळी
39 गालावर पडते ती...खळी
40 प्रतिस्पर्ध्याची मात ...खेळी

ConversionConversion EmoticonEmoticon