सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 31 March

 

दैनिक परिपाठ

31 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
गुलाब पाणी देणाऱ्या हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.

🔺️ दिनविशेष 
१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

१९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  खंड न पडणे-अर्थ : एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे. 

▪️वाक्य : नित्यनेमाने देवपूजा करण्यात आजीचा कधीही खंड पडला नाही.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : अति शहाणा त्याचा बैल रिकामा 

▪️अर्थ  : अति शहाणपणाने नुकसान होते.

🔺️ कोडे 
▪️ अशा भाजीचं नाव सांगा ज्या भाजीमध्ये एक प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे!

▪️उत्तर - सिमला

🔺️ सामान्यज्ञान 
१)  भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक
२) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
 उत्तर : चीन
३) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ
४) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
५) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या
कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A
🔺️ बोधकथा
                      विश्वासघात
जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !
तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.   

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »