सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 26 March

   

दैनिक परिपाठ

26 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
खिडकी म्हणजे आकाश नसतं.

🔺️ दिनविशेष 
१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

२०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :   काळ्या पाण्याची शिक्षा - अर्थ : मरेपर्यंत कैद होणे. 

▪️वाक्य : इंग्रज सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज 

▪️अर्थ  : गरजवंताला बुद्धी नसते.

🔺️ कोडे 
▪️ डोक्यावर तुरा,रंगीत पिसारा,पावसात नाचतो छान,ओळखा पाहू मी कोण?

▪️उत्तर - मोर

🔺️ सामान्यज्ञान 
१) कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्रावर पाणी शोधलं?
उत्तर - नासा
२) भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?
उत्तर -  केरळ
३) कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात?
उत्तर - कोसी
४) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर
कोणते?
उत्तर - मुंबई
५) महाराष्ट्रात मुबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
उत्तर - पुणे
🔺️ बोधकथा
                   पुनर्वापराचे महत्त्व
एक प्राध्यापक होते. ते गावोगावी फिरून प्रबोधन करायचे. ते एका प्रदेशात गेले. तो प्रदेश इतका सुपीक नव्हता. त्यामुळे ते जेथे जातील तेथे त्यांना गरीबीचेच दर्शन होत होते. असेच एका दिवशी ते एका गावी गेले होते. तिथे त्यांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट दिली. पावसाचे दिवस चालू होते. त्यामुळे तो शेतकरी जमिनीच्या मशागतीची तयारी करत होता. घरापुढील अंगणात त्याची पत्नी , मुले व तो बियाणे साफ करीत होते. प्राध्यापकांनी ते बियाणे पाहिले त्यात खूपच खडे, कचरा होता. शेतक-याचे कुटुंब हाताने तो कचरा, खडे काढून बियाणे स्वच्छ करीत होते. हे पाहून प्राध्यापक म्हणाले ," अरे मित्र! तुम्ही हे सर्व हाताने स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ घालावीत आहात. तुमच्याकडे मोठी चाळण नाही का?" तेंव्हा शेतकरी म्हणाला,"साहेब ! आम्ही गरीब माणसे! आमच्याकडे कोठून इतके पैसे असणार चाळण विकत आणण्यासाठी !" ते ऐकून प्राध्यापक फक्त हसले, आणि त्यांनी सर्व घराभोवती एक फेरफटका मारला. त्यांना घराच्या मागे एक गंजलेला पत्रा सापडला, तेथे एके ठिकाणी ते बसले, आपल्या पिशवीतून एक टोच्या काढला. जवळच पडलेल्या एका जड दगडाच्या साह्याने त्यांनी त्या पत्र्यावर छिद्रे पाडली, बाजूला पडलेल्या लाकडाच्या ढलप्या काढल्या. पिशवीतून चार खिळे काढले. लाकडाला पत्रा ठोकून छानपैकी चाळण तयार केली व शेतकऱ्याच्या हातात देत प्राध्यापक म्हणाले," जुन्या गोष्टी न टाकता त्याचा पुन्हा कसा वापर करता येईल याचा विचार जर केला तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे." शेतकऱ्याने त्यांचे खूप आभार मानले. 
तात्पर्य - टाकाऊमधून निश्चितपणे टिकावू व उपयोगी निर्माण करता येते. त्याने आपले पैसे वाचतील.    
 

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »