दैनिक परिपाठ
25 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रीय बनतो.
🔺️ दिनविशेष
१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
२०१३: मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : काळजी घेणे-अर्थ : चिंता वाहणे, आस्था असणे.
▪️वाक्य : राजू आजारी पडल्यामुळे आईने त्याची खूप काळजी घेतली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : अति शहाणा त्याचा बैल रिकामा
▪️अर्थ : अति शहाणपणाने नुकसान होते.
🔺️ कोडे
▪️ अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान ?
▪️उत्तर - जीभ
🔺️ सामान्यज्ञान
१) खालीलपौकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महमार्ग आहे?
उत्तर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44
२) 99 वी इंडियन सायन्स कॉंग्रेस परिषद कोठे झाली?
उत्तर -भुवनेश्वर
३) आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी पहिली स्वयंसेवी संघटना कोणती?
उत्तर - जागतिक आरोग्य संघटना
४) भारताशेजारील कोणत्या देशाने 'नो मास्क नो सर्व्हिस' धोरण प्रथम अंमलात आणले?
उत्तर - बांगलादेश
५) कोणत्या राज्याने पी. एम. स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्यात प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर - उत्तरप्रदेश
🔺️ बोधकथा
पुनर्वापराचे महत्त्व
एक प्राध्यापक होते. ते गावोगावी फिरून प्रबोधन करायचे. ते एका प्रदेशात गेले. तो प्रदेश इतका सुपीक नव्हता. त्यामुळे ते जेथे जातील तेथे त्यांना गरीबीचेच दर्शन होत होते. असेच एका दिवशी ते एका गावी गेले होते. तिथे त्यांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट दिली. पावसाचे दिवस चालू होते. त्यामुळे तो शेतकरी जमिनीच्या मशागतीची तयारी करत होता. घरापुढील अंगणात त्याची पत्नी , मुले व तो बियाणे साफ करीत होते. प्राध्यापकांनी ते बियाणे पाहिले त्यात खूपच खडे, कचरा होता. शेतक-याचे कुटुंब हाताने तो कचरा, खडे काढून बियाणे स्वच्छ करीत होते. हे पाहून प्राध्यापक म्हणाले ," अरे मित्रा! तुम्ही हे सर्व हाताने स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ घालावीत आहात. तुमच्याकडे मोठी चाळण नाही का?" तेव्हा शेतकरी म्हणाला,"साहेब ! आम्ही गरीब माणसे! आमच्याकडे कोठून इतके पैसे असणार चाळण विकत आणण्यासाठी !" ते ऐकून प्राध्यापक फक्त हसले, आणि त्यांनी सर्व घराभोवती एक फेरफटका मारला. त्यांना घराच्या मागे एक गंजलेला पत्रा सापडला, तेथे एके ठिकाणी ते बसले, आपल्या पिशवीतून एक टोच्या काढला. जवळच पडलेल्या एका जड दगडाच्या साह्याने त्यांनी त्या पत्र्यावर छिद्रे पाडली, बाजूला पडलेल्या लाकडाच्या ढलप्या काढल्या. पिशवीतून ४ खिळे काढले. लाकडाला पत्रा ठोकून छानपैकी चाळण तयार केली व शेतकऱ्याच्या हातात देt प्राध्यापक म्हणाले," जुन्या गोष्टी न टाकता त्याचा पुन्हा कसा वापर करता येईल याचा विचार जर केला तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे." शेतकऱ्याने त्यांचे खूप आभार मानले.
तात्पर्य- टाकावूमधून निश्चितपणे टिकावू व उपयोगी निर्माण करता येते. त्याने आपले पैसे वाचतील.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon