सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 50

  

ज्ञानकुंभ - 50 
अचूक शब्द लिहा.
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ गुरुवार दिनांक 26/03/2026

उपक्रम : अचूक शब्द लिहा.

🔺️ प्रश्नसूची

उदा.

१. म्हणे शिरा खाल्ल्याने शिरा आखडतात.

२. ----- पिऊन मग एक झोप -----.

३. ------- झाली की ------ मिळत नाही. 

४. एक ------- सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर -- खाऊन आहे.

५. ------- भर थांब, मग पळायचे तिथे --------.

६. --------- सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, ------------ इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.

७. ---------- वर्षी काय रे ------ वाढवता..??

८. --------- खाऊ नकोस, खराखरा --------- बोल.

९. नारळाचा ---------- पिळून घेतला तर त्याला काही ------ राहत नाही.

१०. त्याने सहीची अगदी -----  ---नक्कल केली.

११. ------पक्षाची खोली -----आहे.

१२. खोबर्‍यातला मुलांचा -----देऊन मग बाकीच्याची चटणी -----.

१३. ------- सभेतील मंत्र्यांचे --------चांगलेच गाजले.

१४. फाटलेला शर्ट ---------- नाही तोपर्यंत मी त्याला --------- नाही.

१५. भटजी म्हणाले, --------- हातात घेऊन विधी सुरू ---------.

१६. धार्मिक -------- करायला कोणताही ----------  निषेध नसावा.

१७. अभियंता म्हणाला, इथे --- ----

१८. उधळलेला --------- थबकला, मनात म्हणाला, इकडे -------- की तिकडे --------.

१९. कामासाठी भिजवलेली --------- उन्हाने ----------- लागली.

२०. दरवर्षी नवा प्राणी ---------- निसर्गाशी बांधिलकी ---------- असतो.

२१. फुलांच्या -----केसांत -----.

 🔺️ उत्तरसूची 

१. म्हणे शिरा खाल्ल्याने शिरा आखडतात.

२. काढा पिऊन मग एक झोप  काढा.

३. हार झाली की हार मिळत नाही. 

४. एक  खार सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर खार खाऊन आहे.

५.  पळ भर थांब, मग पळायचे तिथे पळ.

६. पालक सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, पालक इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.

७. दर वर्षी काय रे दर वाढवता..??

८.भाव खाऊ नकोस,खराखरा भाव बोल.

९. नारळाचा चव पिळून घेतला तर त्याला काही चव राहत नाही.

१०. त्याने सहीची अगदी सही सही नक्कल केली.

११. वर पक्षाची खोली वर आहे.

१२. खोबर्‍यातला मुलांचा वाटा देऊन मग बाकीच्याची चटणी  वाटा.

१३. विधान सभेतील मंत्र्यांचे  विधान चांगलेच गाजले.

१४. फाटलेला शर्ट शिवत नाही तोपर्यंत मी त्याला शिवत नाही.

१५. भटजी म्हणाले, करा हातात घेऊन विधी सुरू करा.

१६. धार्मिक विधी करायला कोणताही  विधी निषेध नसावा.

१७. अभियंता म्हणाला, इथे बांध बांध.

१८. उधळलेला वळू थबकला, मनात म्हणाला, इकडे वळू की तिकडे वळू.

१९. कामासाठी भिजवलेली वाळू उन्हाने  वाळू लागली.

२०. दरवर्षी नवा प्राणी पाळत निसर्गाशी बांधिलकी पाळत असतो.

२१. फुलांच्या माळा केसांत माळा.

Previous
Next Post »