दैनिक परिपाठ
22 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
तलवार ही शौर्याची नव्हे; भीतीची निशाणी आहे.
🔺️ दिनविशेष
१९४५: अरब लीगची स्थापना झाली.
१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : कहर करणे - अर्थ : अतिरेक करणे.
▪️वाक्य : एके दिवशी मुलांनी वर्गात गोंधळाचा कहर केला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : पायीची वहाण पायी बरी.
▪️अर्थ : योग्यतेप्रमाणे वागवावे.
🔺️ कोडे
▪️ आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई ?
उत्तर - बासरी
🔺️ सामान्यज्ञान
१) भारताने फ्रान्सला किती राफेल
विमानांची ऑर्डर दिली आहे?
उत्तर - ३६
२) अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांसाठी काम करता करताच शिक्षणाची जी संकल्पना अमलात आणली तिचे नाव काय?
उत्तर - कुरण शाळा
३) छोट्या शहरांसाठी नगरपालिका आणि मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका ही संकल्पना अमलात आणणारी घटना दुरुस्ती कोणती?
उत्तर - ७४ वि (९ अ)
४) आपत्ती व्यवस्थापन कायदा भारतात
कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?
उत्तर - २००५
५) निर्मल ग्रामपुरस्कार कुणाकडून दिला
जातो?
उत्तर - केंद्रसरकार
🔺️ बोधकथा
समाधान
कोणे एके काळी एक अतिशय आनंदाने व समाधानाने जगणारा कावळा होता. एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा हंसाला पाहिले. तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला," तू किती शुभ्र व सुंदर आहेस. मी मात्र काळा, कुरूप आहे. तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजे."
हंस म्हणाला," एका पोपटाला पाहीपर्यंत मलाही असेच वाटत होते. पण त्याच्याकडे सुंदर असे दोन रंग आहेत. मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे. तू पोपटाची भेट घे, त्याची ऐट बघ, त्याचे सौंदर्य बघ मग तोच कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल." हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला.
पोपटाला त्याने हंसाप्रमाणे विचारले असता पोपट म्हणाला," काय सांगू मित्रा! मला ही माझ्या सौंदर्याचा अभिमान होता पण मोरापेक्षा या जगात कुणीच सौंदर्यवान पक्षी नाही. त्याच्याकडे कितीतरी रंग आहेत. तो किती सुंदर आहे.
पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा मोराच्या शोधात निघाला.
खूप शोधल्यानंतर एका प्राणीसंग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला. त्याच्याभोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते. कावळा तेथे गेला आणि म्हणाला," प्रिय मोरा! तू फारच सुंदर आहेस. लोक तुझ्या जवळ येवून तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले हाकलून देतात. मला खात्री आहे की पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस."
मोर म्हणाला,"मलाही असेच वाटत होते. मी आनंदी का नसावे? सौंदर्यात माझी तोड नाही, पण हेच सौंदर्य माझ्या दुखा:चे कारण ठरले आहे. मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे. तुझ्यासारख्या कावळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही.ते केव्हाही मुक्त संचार करू शकतात. त्यामुळे काकराज! तूच या जगातला सर्वात आनंदी पक्षी असावास!"
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon