सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 23 March

   

दैनिक परिपाठ

23 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

🔺️ दिनविशेष 
१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :   कापरे सुटणे-अर्थ : घाबरल्यामुळे थरथरणे. 

▪️वाक्य : अचानक समोर आलेला वाघ पाहून नथुरामच्या अंगाला कापरे सुटले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना.

▪️अर्थ  : दोन्ही बाजूंनी अडचण.

🔺️ कोडे 
▪️ हरण पळतं, दूध गळतं ? 
उत्तर - दळणाचे जाते

🔺️ सामान्यज्ञान 
१) अखिलभारतीय वृत्तपरिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली?
उत्तर - १९५४
२) प्रेअरीज व स्टेप्स हा प्रदेश कोणत्या भागात येतो? 
 उत्तर - समशीतोष्ण
३) भारतात मोठ्या प्रमुख बंदरांची संख्या किती आहे?
 उत्तर - १२
४) सर्वाधिक भूभाग जंगलाखाली असणारे राज्य कोणते?
उत्तर -  मध्यप्रदेश
५) मिठागरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?
 उत्तर - रायगड
🔺️ बोधकथा
               मन सदैव शुद्ध ठेवा !
एक राजा आणि नगरशेठ यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. नगरशेठ चंदनाचा व्यापार करीत होता. एक दिवस नगरशेठला माहित झाले कि, लाकडाची विक्री कमी झाली आहे. हे ऐकताच शेठच्या मनात विचार आला कि राजाचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक चंदनाची लाकडे त्याच्याकडून खरेदी करतील. यातून त्याला नफा होईल. 

संध्याकाळी राजाकडे भेटायला नगरशेठ गेला. त्याला पाहून राजाच्या मनात विचार आला कि, नगरशेठने माझ्याशी मैत्री करून अपार धन मिळविले आहे. एखादा असा नियम बनविला पाहिजे कि ज्यामुळे याचे सारे धन राज्याच्या तिजोरीमध्ये जमा व्हायला पाहिजे. 

एक दिवस नगरशेठला राहवले नाही, त्याने राजाला विचारले, "मागील काही दिवसांपासून आपल्या मैत्रीत अंतर पडले आहे असे का?" राजाने म्हटले,"मलाही असेच वाटते! चला नगराच्या बाहेर एक साधू राहत आहे. त्यांना याचे कारण विचारू." दोघे साधूकडे गेले, त्यांना आपली समस्या सांगितली आणि विचारले," आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट विचार का येत आहेत? कृपया याचे कारण सांगावे" साधू म्हणाले," राजा आणि नगरशेठ !! तुम्ही दोघे पहिले शुद्ध भावनेतून भेटत होता. पण आता तुमच्या मनात वाईट विचार आले असतील. " शेठला साधू म्हणाले," तुम्ही असा का विचार केला नाही कि, राजा चंदनाच्या लाकडाची माडी बांधेल. तू राजाविषयी चुकीचा विचार केला. त्यामुळे राजाच्या बद्दल तुझ्या मनात वाईट विचार आला. तुझ्या लाकडाची तेव्हाही विक्री होणारच होती." राजाला साधू म्हणाले," नगरशेठच्या धनाची तू आशा धरलीस त्यामुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले." त्यानंतर त्यांनी दोघांना मनातील वाईट विचार काढून टाकण्यास सांगितले. चुकीच्या विचाराने मैत्रीत अंतर वाढविले गेले असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर राजा आणि नगरशेठ दोघे परत पाहिल्यासारखे वागू लागले.            

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »