सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 21 March

  

दैनिक परिपाठ

21 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

🔺️ दिनविशेष 
१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  कसून मेहनत करणे - अर्थ : खूप नेटाने कष्ट करणे. 

▪️वाक्य : शालान्त परीक्षेत पहिले येण्यासाठी मधुराने कसून मेहनत केली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : तेरड्याचा रंग तीन दिवस  

▪️अर्थ  : कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.

🔺️ कोडे 
▪️ काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय  ? 
उत्तर - चप्पल ( वहाण )

🔺️ सामान्यज्ञान 
१) भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन
करणारे राज्य कोणते आहे?
उत्तर - कर्नाटक

२) शांघाय सहकार्य संघटना (SCO) स्टार्टअप फॉर्म” या कार्यक्रमाची सुरवात (उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते)
 केव्हा करण्यात आली?
 उत्तर - २७ ऑक्टोबर २०२०
३) केंद्रीय सतर्कता (दक्षता) आयोगाद्वारे सतर्कता (दक्षता) सप्ताहाचे पालन कोणत्या आठवड्यात केले जाते?
उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या आठवड्यात

४) २७ ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय टपाल खाते आणि अमेरिकी टपाल खाते यांच्या कशा संबंधी करार झाला?
उत्तर - टपालाचे वाहतूक सीमा शुल्काविषयी

५) भाजीपाल्यासाठी किमान किंमत ठरविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 
उत्तर - केरळ
🔺️ बोधकथा
                    दुसरी बाजू
एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठविण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. सगळी स्थाने पाहिली. थोर मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वात शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला. बराच वेळ सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर कुणीतरी अचानकच बिरबलाला विचारले,"महाशय! आपले देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? किंवा यांची कशी तुलना तुम्ही कराल? " बिरबलाने तात्काळ त्याचे उत्तर दिले,"अहो! तुमचे बादशहा म्हणजे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा हे प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत." या उत्तरावर त्या दरबारातील सर्वचजण खुश झाले. त्या बादशाहाने तर बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला. आपल्या देशी जेव्हा बिरबल परतला तेव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जावून कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी झोंबले. बादशाहालाही हे आवडले नाही त्याने बिरबलाला विचारले,"तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उद्गार का काढले?" यावर बिरबल म्हणाला,"महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. तर पर्शियाच्या बादशाहाला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.
तात्पर्य- कोणत्याही गोष्टीत नेहमी सकारात्मक बाजू पहावी. एखाद्या गोष्टीला दुसरी पण बाजू असू शकते तेंव्हा दुसरी बाजू समजून घ्यावी.        
 

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »