दैनिक परिपाठ
20 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे,शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
🔺️ दिनविशेष
१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : कस लावणे-अर्थ : सत्त्व किंवा सामर्थ्य पणाला लावणे.
▪️वाक्य : हिंदकेसरी होण्यासाठी बापू पहेलवानाने प्रत्येक कुस्तीत आपला कस लावला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : नव्याचे नऊ दिवस.
▪️अर्थ : नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही.
🔺️ कोडे
▪️ वीस लुगडी,आतून उघडी ?
▪️उत्तर - मक्याचे कणीस
🔺️ सामान्यज्ञान
1) गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात कोठे साजरा केला जातो?
उत्तर - महाराष्ट्र
2) भारतात स्वातंत्र्यदिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - 15 ऑगस्ट रोजी
3) भारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची
घोषणा कोणी केली?
उत्तर - पंतप्रधान इंदिरा गांधी
4) भारतात राष्ट्रीय शिक्षण धोरण केव्हा सुरू झाले?
उत्तर - 1986
5) भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर - आठ
🔺️ बोधकथा
कासव आणि बगळे
1) एका तलावात कासव आणि दोन बगळे मित्र होते.
2) दुष्काळामुळे तलावाचे पाणी सुकत चालले होते. बगळ्यांनी दुसऱ्या तलावावर जाण्याचा विचार केला.
3) कासवाने त्यांच्यासोबत जाण्याची विनंती केली. बगळ्यांनीत उपाय शोथलाः त्यांनी कासवाला एका काठीला तोंडाने धरण्यास सांगितले आणि ते काठीच्या दोन्ही टोकांना पकडून उडणार होते. प्रवासादरम्यान कधीही न बोलण्याची कासवाला चेतावणी दिली.
4) ते हवेत उडू लागले. गावावरून जाताना लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले आणि ओरडू लागले - "बघा! कासव आणि बगळे उडताहेत !"
5) लोकांचे ओरडणे ऐकून कासवाला राग आला आणि त्याने विचारले "ते कशाबद्दल बोलत आहेत?" तो बोलताच काठी सुटली आणि खाली पडला.
6) कासव जमिनीवर पडला आणि त्याला इजा झाली (किंवा मेला). बगळे खूप दुःखी झाले.
तात्पर्य : अयोग्यवेळी बोलण्याचे वाईट परिणाम होतात.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon