दैनिक परिपाठ
19 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
🔺️ दिनविशेष
१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
१९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : कणीक तिंबणे - अर्थ : बदडून काढणे,चोप देणे.
▪️वाक्य : काल पकडलेल्या चोराची पोलिसांनी रात्रभर चांगलीच कणीक तिंबली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : छत्तीसाचा आकडा
▪️अर्थ : विरुद्ध मत असणे.
🔺️ कोडे
▪️ सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा नव्हे.गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे. ओळखा पाहू मी कोण?
▪️उत्तर - पाण्याचा रहाट
🔺️ सामान्यज्ञान
१) भारतात एकूण किती राज्ये आहेत?
उत्तर - अठ्ठावीस
२) भारतातील सर्वात प्राचीन पर्वतराजी
कोणती?
उत्तर - अरावली पर्वत
३) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?
उत्तर - गोदावरी
४) सतलज नदीवर कोणता प्रकल्प बनला
आहे?
उत्तर - भाकरा-नांगल
५) दक्षिणा गंगा हे कोणत्या नदीचे पर्यायी
नाव आहे?
उत्तर - गोदावरी नदी
🔺️ बोधकथा
सेनापती आणि मार्गदर्शक
एका गावात एक मार्गदर्शक समस्यांचे अत्यंत समाधानकारक निरसन करीत असे. एकदा त्या देशाचा सेनापती त्याच्याकडे गेला व म्हणाला,"महाराज! मला स्वर्ग व नरक यातील फरक समजावून घ्यायचा आहे. आपण कृपया समजावून सांगाल का?" मार्गदर्शकाने त्याच्याकडे पाहिले व त्याला त्याचा परिचय विचारला. सेनापतीने त्याच्या वीरतापूर्ण कार्याच्याबाबतीत सविस्तर सांगितले. त्याची सर्वमाहिती ऐकून मार्गदर्शक म्हणाला,"चेहऱ्याने तर तुम्ही सेनापती नाही तर भिकारी दिसता. माझा विश्वास बसत नाहीये कि तुमच्याकडून तलवारसुद्धा उचलत असेल." हे ऐकून सेनापतीने रागाने म्यानातून तलवार उपसली. सेनापतीच्या या कृतीकडे पाहत मार्गदर्शक म्हणाला,"अरे वा ! तुम्ही तर तलवारही बाळगता, लोखंडाची असती तर तुमच्या हातून गळून पडली असती." हे उद्गार ऐकताच सेनापतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्याने तीच तलवार घेवून मार्गदर्शकाच्या दिशेने हल्ला करण्यास सुरुवात केली, हातातील तलवारीने तो आता मार्गदर्शकावर घाव घालणार इतक्यात मार्गदर्शक म्हणाले," हे सेनापती ! बस हाच तो नरक! क्रोधाने उन्मत्त होवून आपण विवेक घालवून माझ्यावर हल्ला केला आणि माझी हत्या करण्यास तयार झालात यालाच नरक असे म्हणतात." हे ऐकून सेनापतीने तलवार म्यानात ठेवली. तेव्हा मार्गदर्शक म्हणाले,"विवेक जागृत झाल्यावर व्यक्तीला आपल्या चुकांची जाणीव होते. विवेक गमावून कोणतेही कार्य केल्यास नाशाला कारणीभूत व्हावे लागते. " सेनापतीला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon