ज्ञानकुंभ - 47
'णि/ णी' या अक्षराने शेवट होणारे शब्द लिहा.
🔶️ संकलित
❇️ शुक्रवार दिनांक 20/03/2026
उपक्रम : 'णि/ णी' या अक्षराने शेवट होणारे शब्द लिहा.
🔺️ प्रश्नसूची
१) जत्रेत मुले वाजवतात -
२) डोळ्यांचे रक्षण हिच्या मुळे होते -
३) भूतबाधा -
४) शरीरातील या शिरेमधुन शुद्ध रक्त वाहून नेले जाते, एक नक्षत्र -
५) एक द्रव पदार्थ -
६) एका गावाचे नाव -
७) मुलासाठी जिवावर उदार होवून कडा उतरणारी -
८) दिवाळी मधे औक्षण केल्यावर मिळते -
९) इथे पीठ दळून मिळते -
१०) बहिणाबाई यांच्या कविता या भाषेत असतात -
११) सुटे पैसे -
१२) भारतीय पदार्थ चवदार होण्यासाठी देतात -
१३) पूर्वी पत्रकार, लेखक हिच्याशिवाय अपूर्ण -
१४) सगळे एकाच माळेचे -
🔺️ उत्तरसूची
१) जत्रेत मुले वाजवतात - पिपाणी
२) डोळ्यांचे रक्षण हिच्या मुळे होते - पापणी
३) भूतबाधा - करणी
४) शरीरातील या शिरेमधुन शुद्ध रक्त वाहून नेले जाते, एक नक्षत्र - धमणी
५) एक द्रव पदार्थ - पाणी
६) एका गावाचे नाव - निपाणी
७) मुलासाठी जिवावर उदार होवून कडा उतरणारी - हिरकणी
८) दिवाळी मधे औक्षण केल्यावर मिळते - ओवाळणी
९) इथे पीठ दळून मिळते - गिरणी
१०) बहिणाबाई यांच्या कविता या भाषेत असतात - अहिराणी
११) सुटे पैसे - नाणी
१२) भारतीय पदार्थ चवदार होण्यासाठी देतात - फोडणी
१३) पूर्वी पत्रकार, लेखक हिच्या शिवाय अपूर्ण - लेखणी
१४) सगळे एकाच माळेचे - मणी

ConversionConversion EmoticonEmoticon