दैनिक परिपाठ
17 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.
🔺️ दिनविशेष
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : कटाक्ष असणे-अर्थ : कल असणे, भर असणे, जोर असणे.
▪️वाक्य : छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्यावर कटाक्ष होता.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : अंथरूण पाहून पाय पसरावे.
▪️अर्थ : ऎपत पाहून खर्च करावा.
🔺️ कोडे
▪️ फक्त सकाळीच मी येतो, जगभरातील बातम्या सांगतो, माझ्याशिवाय प्रत्येकजण होतो दुःखी तर कधी आनंदी! सांगा पाहू मी कोण?
▪️उत्तर - वर्तमानपत्र
🔺️ सामान्यज्ञान
▪️थोरांच्या महत्वाच्या घोषणा
(१) “आराम हराम है” – पंडित नेहरू
(२) “चले जाव”-महात्मा गांधी
(३) “जय जवान जय किसान !” -लाल बहादूर शास्त्री
(४) “मेरी झाशी नही दूँगी”– राणी लक्ष्मीबाई
(५) “तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूँगा” – सुभाषचंद्र बोस
(१) “आराम हराम है” – पंडित नेहरू
(२) “चले जाव”-महात्मा गांधी
(३) “जय जवान जय किसान !” -लाल बहादूर शास्त्री
(४) “मेरी झाशी नही दूँगी”– राणी लक्ष्मीबाई
(५) “तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूँगा” – सुभाषचंद्र बोस
🔺️ बोधकथा
संत आणि शिष्य
एका संताच्या आश्रमात शेकडो गाई होत्या. त्या गाईच्या उत्पन्नातून ते आश्रम चालवीत असत. एकेदिवशी एक शिष्य म्हणाला,"गुरुजी! आश्रमाच्या दुधात दररोज पाणी मिसळण्यात येत आहे." संताने ते रोखण्यासाठी त्याला उपाय विचारला तेंव्हा तो म्हणाला, "एक कामगार ठेवू, तो दुधाची देखरेख करेल," संताने ते मान्य केले. दुसऱ्याच दिवशी कामगार नेमण्यात आला. तीन दिवसानंतर तोच शिष्य येवून संताला म्हणाला,"या कामगाराची नियुक्ती केल्यापासून दुधात जास्तच पाणी मिसळले जात आहे." संताने म्हटले,"आणखी एका व्यक्तीची नियुक्ती करा तो पहिल्या कामगारावर लक्ष ठेवेल" आणि तसेच करण्यात आले. परंतु दोन दिवसानंतर आश्रमात गोंधळ उडाला, सर्व शिष्य संताकडे येवून म्हणाले,"आज दुधात पाणी तर होतेच पण त्याबरोबर एक मासाही आढळून आला," तेंव्हा संत म्हणाले," तुम्ही भेसळ रोखण्यासाठी जितके कामगार ठेवलं तितकी भेसळ जास्त होईल. कारण प्रथम या अनैतिक कामात कमी कामगारांचा सहभाग असतो तेंव्हा पाणी कमी असते, एक कामगार वाढल्याने त्याचा हिस्सा ठेवून पाणी अधिक मिसळले जावू लागले, इतके पाणी मिसल्यावर त्यात मासा नाही तर लोणी येईल." तेंव्हा शिष्यांनी यावर उपाय विचारला तेंव्हा संत म्हणाले,"यासाठी त्यांची कामावर निष्ठा वाढवावी लागेल तर ते काम प्रामाणिकपणे करतील."
तात्पर्य - प्रतिबंध लावण्याऐवजी मार्गदर्शन केल्याने, विचार बदलल्याने व्यक्ती कुमार्ग सोडून सन्मार्ग धरतील.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon