सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 45

 

ज्ञानकुंभ - 45  
'ऐ'ने सुरु होणारे समानार्थी शब्द लिहा.
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ मंगळवार दिनांक 17/03/2026

उपक्रम :  'ऐ'ने सुरु होणारे समानार्थी शब्द लिहा.

🔺️ प्रश्नसूची

🔹️ खालील शब्दांना किंवा शब्दसमुहाला 'ऐ'ने सुरु होणारे समानार्थी शब्द लिहा.

1) श्रवण करणे =

2) इतिहासासंबंधी =

3) इंद्राच्या हत्तीचे नाव=

4) प्रशस्त,मोकळे =

5) वैभव,समृद्धी=

6) मालमत्ता,संपत्ती  =

7) घडकाम करण्याचे सोनाराचे साधन =

8) चैन,सुखविलास=

9) वैकल्पिक,पर्यायी=

10) इहलोकसंबंधाचा =

🔺️ उत्तरसूची 

1) श्रवण करणे = ऐकणे

2) इतिहासासंबंधी = ऐतिहासिक 

3) इंद्राच्या हत्तीचे नाव= ऐरावत

4) प्रशस्त,मोकळे = ऐसपैस

5) वैभव,समृद्धी= ऐश्वर्य

6) मालमत्ता,संपत्ती  = ऐवज

7) घडकाम करण्याचे सोनाराचे साधन = ऐरण

8) चैन,सुखविलास= ऐपत

9) वैकल्पिक,पर्यायी= ऐवजी 

10) इहलोकसंबंधाचा= ऐहिक

Previous
Next Post »