दैनिक परिपाठ
12 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.
🔺️ दिनविशेष
१९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.
१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.
२००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : उद्ध्वस्त करणे-अर्थ : नष्ट करणे.
▪️वाक्य : भारतीय सेनेने शत्रूची सर्व ठाणी उद्ध्वस्त केली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : अती खाणे मसणात जाणे
▪️अर्थ : अति खाणे नुकसानकारक असते.
🔺️ कोडे
▪️ अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली, तरी दमत नाही?
▪️उत्तर - जीभ
🔺️सामान्यज्ञान
1.सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा
2.भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर
3.भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन
4.भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन
5.भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर
🔺️ बोधकथा
पाण्यात पाहणारे सांबर
एक सांबर एकदा पाणी पीत असताना त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तो मनाशीच म्हणाला, 'माझी ही शिंगं किती सुंदर आहेत. तसंच माझं तोंड, डोळे फुलासारखं अंग सगळं कसं सुंदर आहे. पण माझे पायही असेच सुंदर असते तर काय मजा झाली असती! हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे !' असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला. त्याची चाहूल लागताच सांबर आपल्या बारीक पायांनी जोरजोरात पळू लागले. सिंहही त्याच्या मागे लागला. परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली. त्यामुळे त्याला पळता येईना. सिंहाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा सांबर म्हणाले, 'अरेरे ! ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली. पण ज्या शिंगांचा मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐनवेळी दगा दिला.'
तात्पर्य : आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपले प्राण वाचवू शकतात तर आवडणाऱ्या गोष्टी घातही करू शकतात.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon