ज्ञानकुंभ - 41
विशेषणे शोधणे.
🔶️ संकलित
❇️ बुधवार दिनांक 11/03/2026
उपक्रम : विशेषणे शोधणे.
🔺️ प्रश्नसूची
आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?
1) लुसलुशीत-
2) खुसखुशीत-
3) भुसभुशीत-
4) घसघशीत-
5) रसरशीत-
6) ठसठशीत-
7) कुरकुरीत-
8) चुरचुरीत-
9) झणझणीत-
10) सणसणीत-
11) ढणढणीत -
12) ठणठणीत-
13) दणदणीत-
14) चुणचुणीत-
15) टुणटुणीत-
16) चमचमीत-
17) दमदमीत-
18) खमखमीत-
19) झगझगीत-
20) झगमगीत-
21) खणखणीत-
22) रखरखीत-
23) चटमटीत/चटपटीत-
24) खुटखुटीत-
25) चरचरीत-
26) गरगरीत-
27) चकचकीत-
28) गुटगुटीत-
29) सुटसुटीत-
30) तुकतुकीत-
31) बटबटीत-
32) पचपचीत-
33) खरखरीत-
34) खरमरीत-
35) तरतरीत-
36) सरसरीत/सरबरीत-
37) करकरीत-
38) झिरझिरीत-
39) फडफडीत-
40) शिडशिडीत-
41) मिळमिळीत-
42) गिळगिळीत-
43) बुळबुळीत-
44) झुळझुळीत-
45) कुळकुळीत-
46) तुळतुळीत-
47) जळजळीत-
48) टळटळीत-
49) ढळढळीत-
50) डळमळीत-
51) गुळगुळीत-
52) गुळमुळीत-
🔺️ उत्तरसूची
1) लुसलुशीत - पोळी/ पुरणपोळी
2) खुसखुशीत - करंजी
3) भुसभुशीत- जमीन
4) घसघशीत- भरपूर
5) रसरशीत- रसाने भरलेले
6) ठसठशीत- मोठे
7) कुरकुरीत - चकली, कांदा भजी
8) चुरचुरीत - अळूवडी
9) झणझणीत- पिठले, वांग्याची भाजी
10) सणसणीत - मोठया आकाराची पोळी,भाकरी, पराठा
11) ढणढणीत - मोठ्या आवाजात लावलेले संगीत
12) ठणठणीत- तब्येत
13) दणदणीत - भरपूर
14) चुणचुणीत- हुशार
15) टुणटुणीत - तब्येत
16) चमचमीत - पोहे, मिसळ
17) दमदमीत - भरपूर नाश्ता
18) खमखमीत - मसालेदार
19) झगझगीत - प्रखर
20) झगमगीत - दिवे
21) खणखणीत - चोख
22) रखरखीत- ऊन
23) चटमटीत/ चटपटीत- खारे शंकरपाळे,भेळ
24) खुटखुटीत - भाकरी/ दशमी
25) चरचरीत - अळूची खाजरी पाने
26) गरगरीत - गोल लाडू
27) चकचकीत - चमकणारी गोष्ट
28) गुटगुटीत - सुदृढ बालक
29) सुटसुटीत- मोकळे
30) तुकतुकीत- कांती
31) बटबटीत- मोठे डिझाइन
32) पचपचीत - पाणीदार
33) खरखरीत- रफ
34) खरमरीत- पत्र
35) तरतरीत - फ्रेश
36) सरसरीत/सरबरीत- भज्यांचे पीठ
37) करकरीत - सफरचंद, पेरूच्या फोडी
38) झिरझिरीत- पारदर्शक
39) फडफडीत - मोकळा भात
40) शिडशिडीत- बारीक
41) मिळमिळीत - कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
42) गिळगिळीत - मऊ लापशी
43) बुळबुळीत - ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
44) झुळझुळीत- साडी
45) कुळकुळीत- काळा रंग
46) तुळतुळीत - टक्कल
47) जळजळीत- टिळकांचे अग्रलेख
48) टळटळीत - दुपारचे रणरणते ऊन
49) ढळढळीत - सत्य
50) डळमळीत- पक्के नसलेले
51) गुळगुळीत- स्मूथ
52) गुळमुळीत - स्पष्ट न बोलणे

ConversionConversion EmoticonEmoticon