सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 11 March

  

दैनिक परिपाठ

11 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

🔺️ दिनविशेष 
१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  उत्पात करणे - अर्थ : विध्वंस करणे. 

▪️वाक्य : दहशतवाद्यांनी सीमेवर हल्ला करून उत्पात केला.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं.

▪️अर्थ  : एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.

🔺️ कोडे 
▪️ पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून, जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ? 

▪️उत्तर - मीठ 

🔺️ सामान्यज्ञान 
१) बटाट्याचा शोध कोणत्या देशात लावला गेला होता?
उत्तर: पेरू 

२) कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे?
उत्तर: इंडोनेशिया

३)  जगातील कोणता असा पर्वत आहे जो रोज आपला रंग बदलतो?
उत्तर: एयर्स रॉक (Ayers Rock)/ उलरु (ऑस्ट्रेलिया)

४)  एका माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती केस असतात?
 उत्तर: जवळजवळ १ ते १.५० लाख

५) नुआखाई सण हे कोणत्या राज्यात साजरा केले जातो?
उत्तर - ओडिशा आणि छत्तीसगड

🔺️ बोधकथा
                  काल्पनिक मर्यादा
गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले, यथावकाश अंडे उबवल्यावर त्यातून गरुडाचे पिल्लू पडलं. पण ते सदासर्वकाळ कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत असल्याने त्याने स्वत:ला कधीच ओळखले नाही व ते स्वत:ला कोंबडीचे पिल्लू समजू लागले. कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याचे कण वेचणे, कर्कश्य आवाज करत इकडेतिकडे हिंडणे यातच त्याचा वेळ जावू लागला. त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे. कारण डौलदारपणे उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचा लक्ष गेलं आणि बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारला,"हा कोणता पक्षी आहे? किती उंच उडतो आहे? त्याचा रुबाब सुद्धा पाहण्यासारखा आहे." हे एकच त्यातील कोंबडीचे पिल्लू त्याला म्हणाले," तो गरुड पक्षी आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी! पण आपल्याला कुठे त्याच्यासारखा उडायला येणार.कारण आपण पडलो कोंबडीची पिल्ले. तू पण त्यातलाच एक.त्यामुळे त्याचा रुबाब हा फक्त बघ." अशा या उत्तराने गरुडाच्या पिल्लाचे समाधान झाले. त्याने काहीही विचार न करता स्वत:ला कोंबडीचे पिल्लू मानून घेतलं. आपण हि कोंबडी आहोत असेच गरुडाचे पिल्लू म्हणू लागले. स्वत:ला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वत:चा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही, तो एका कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचे पिल्लू म्हणूनच मेला. ! यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावे लागले.
तात्पर्य - आपल्यातील कर्तुत्वाला वाव आपणच दिला पाहिजे, आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाहीत तर अपयशाचे धनी व्हावे लागते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »