सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 10 March

 

दैनिक परिपाठ

10 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?

🔺️ दिनविशेष 
१९७७: युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला.

१९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

१९८५: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळाला.

१९९८: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : ओढा असणे - अर्थ : कल असणे,आवड असणे. 

▪️वाक्य : रमेशचा लहानपणापासून चित्रे काढण्याकडे ओढा होता.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : तरण्याचे कोळसे म्हातार्‍याला बाळसे 

▪️अर्थ  : उलट गुणधर्म असणे.

🔺️ कोडे 
▪️ असे काय आहे जे ज्याचं आहे तोच बघू शकतो? 

▪️उत्तर - स्वप्न 

🔺️ सामान्यज्ञान 
1) नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या
खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर - कार रेसिंग 
2) खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या
राज्यात आहेत ?
उत्तर - मध्य प्रदेश

3) राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक
चार यांचा पिन कोड काय आहे?
उत्तर - 400016
4) लांब उडीचा विश्व रेकॉर्ड कोणाच्या
नावे आहे?
उत्तर - माईक पोवेल
5) कालावल खाडी कोणत्या नदीच्या
मुखाशी आहे?
उत्तर - तेरेखोल

🔺️ बोधकथा
मोहोर आणि बियाणे

अंबाप्रसाद नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना दोन मुलगे होते. एकाचे नाव होते लक्ष्मिधर आणि दुसऱ्याचे भूपाल. लक्ष्मिधरला नावाप्रमाणेच संपत्तीची हाव होती तर भूपाल हा भूमातेची सेवा करण्यात धन्यता मनात असे. अंबाप्रसाद हे आता वृद्ध झाले होते. त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचे ठरविले, राहता वाडा त्यांनी एका शाळेसाठी देवून टाकला. दोन्ही मुलांसाठी त्यांनी दोन पर्याय तयार केले होते. एका बाजूला हंडाभर मोहोरा आणि एका बाजूला माळरान जमीन आणि तीन पोती बियाणे. मग त्यांनी दोन्ही मुलांना बोलावले आणि सांगितले. ह्या दोन गोष्टीपैकी एकाची निवड करण्यास सांगितले, लक्ष्मिधरने विचार केला, माळरान आणि बियाणे घेवून शेती कुठे करत बसणार त्यापेक्षा आपण मोहोरांचा हंडा घेवू आणि त्या पैशाने वाडा विकत घेवून आयुष्यभर सुखात राहू. त्याने तो पर्याय स्वीकारताच भूपालाकडे दुसरा पर्याय नव्हताच. त्याने आनंदाने आपल्या वडिलांची ती देणगी स्वीकारली. अंबाप्रसादांचे काही दिवसातच निधन झाले. त्यांच्यानंतर ठरल्याप्रमाणे वाटण्या झाल्या. लक्ष्मिधरने नवीन घर घेतलं. तो चैनीत राहू लागला. भूपाल मात्र माळरान जमीन कसण्यासाठी तयार झाला. त्याने ती जमीन नांगरली, खूप कष्ट घेतले, मशागत केली, वडिलांकडून मिळालेलं बियाणे पेरले. जमीन चांगली होतीच पण कसलेली नसल्याने माळरान झाली होती. जमीन पिकाने बहरली, शेतं डोलू लागली, सुगी झाली आणि भूपालचे घर म्हणजे धान्याचे कोठार झाले, लक्ष्मिधर मात्र संपत्ती उधळत होता आणि मोहोरा संपवून दरिद्री होत होता. भूपाल मात्र सुखाने राहू लागला. वडिलांची देणगी त्याला समजली होती. 

तात्पर्य - केवळ संपत्तीपेक्षा श्रमाचं धन उपयोगी येतं. श्रम हे मानवाला संपत्ती मिळवून देतात हेच खरे.       

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »