ज्ञानकुंभ - 39
प्रत्यय जोडून शब्द तयार करणे.
बुद्धिला चालना देणारा उपक्रम
🔶️ संकलित
❇️ सोमवार दिनांक 09/03/2026
उपक्रम : प्रत्यय जोडून शब्द तयार करणे.
🔺️ प्रश्नसूची
(१) भर -
(२) दार -
(३) वर -
(४) करी -
(५) वान -
🔺️ उत्तरसूची
(१) भर -
मिनिटभर,तासभर,दिवसभर, महिनाभर,वर्षभर,सालभर, वीतभर,ओंजळभर,डबाभर, टोपलीभर,वावभर,गावभर,रात्रभर,जन्मभर
(२) दार -
दुकानदार, जमीनदार, फौजदार,साथीदार,धारदार, दिलदार,किल्लेदार, शिलेदार,खबरदार,शानदार, रखवालदार,डौलदार,ऐटदार रूबाबदार,टोकदार
(३) वर -
झाडावर, हातावर,टेबलावर, खुर्चीवर,घरावर,दारावर, टेकडीवर, फांदीवर,भिंतीवर पाण्यावर, होडीवर, पंख्यावर,घड्याळावर, मंडपावर,जमीनीवर, डोंगरावर
(४) करी -
शेतकरी, कष्टकरी, देणेकरी, पहारेकरी,वारकरी,मानकरी, कामकरी,गावकरी,शाळकरी
(५) वान -
बलवान,धनवान,रूपवान, बागवान,गाडीवान,गुणवान, शीलवान,धैर्यवान,भगवान, प्रतिभावान,प्रज्ञावान

ConversionConversion EmoticonEmoticon