दैनिक परिपाठ
09 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.
🔺️ दिनविशेष
१९४५: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
१९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
१९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.
१९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : ओढ असणे - आस असणे, आवड असणे.
▪️वाक्य : शेवंताला फुलांची खूप ओढ आहे.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले.
▪️अर्थ : जिवंतपणी दुर्लक्ष करायचे आणि मेल्यावर गोड कौतुक करायचे.
🔺️ कोडे
▪️कोंबडी देते अंडी, गाय देते दूध, पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो?
▪️उत्तर - दुकानदार
🔺️ सामान्यज्ञान
१) WHO ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
उत्तर - १९४८
२) जागतिक मानवी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - १० डिसेंबर
३) खालीलपौकी कोणता देश ब्रिक्य
(BRICS) या जागतिक संघटेनेचा सदस्य नाही?
उत्तर - इंडोनेशिया
४) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर - बुध
५) काथ कोणत्या वृक्षापासून मिळतो?
उत्तर - खैर
🔺️ बोधकथा
बुद्धिबळ
एक पंडित एकदा एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला,"महाराज ! मी आवाहन करतो कि या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावे. जर मी जिंकलो तर मला हजार होन द्यावे आणि मी हरलो तर मी राजाचा गुलाम म्हणून राहीन." राजाने ते आवाहन स्वीकारले. वादसभा सुरु झाली, पंडित हा त्या राजाच्या जनतेपेक्षा खूप हुशार निघाला. त्याने सर्वाना हरविले. आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार होन देण्याची वेळ आली तेंव्हा राजा म्हणाला,"पंडितजी! तुम्ही मला कुठे हरविले आहे? " हे ऐकताच पंडित म्हणाला,"महाराज! आपण राजे, मी आपल्याला कसा काय हरविणार?" राजा म्हणाला,"अहो! मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतो आहे. तुम्ही माझ्याशी बुद्धिबळ खेळा, जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार होन मी देईन आणि मी जिंकलो तर तुमचा शिरच्छेद करेन." पंडिताने हे ऐकले आणि तो घाबरला त्याला बुद्धिबळ खेळता येत नव्हते. पंडित म्हणाला,"महाराज, मला आपल्याइतकं चांगलं बुद्धिबळ खेळता येणार नाही, तेंव्हा मी मरणार हे निश्चित आहे. तेंव्हा माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेंव्हा मरण्यापूर्वी माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी विनंती करतो." राजा म्हणाला,"किती पाहिजे तितके मागा देतो!" पंडित म्हणाला," महाराज! पण तांदूळ देताना मला असे द्या कि या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या. म्हणजे पहिल्या घरात जर एक दाणा असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने तांदळाची संख्या वाढवून मला द्या." राजाला हे सोपे वाटले त्याने ते मान्य केले. राजाला गणित लक्षात आलं नाही. बुद्धिबळाच्या बत्तिसाव्या घरात जेंव्हा तांदूळ मोजणी चालू झाली तेंव्हा तांदळाची संख्या झाली होती २१४ कोटी. हे देण्यासाठी राजाचा पूर्ण खजिना रिता करावा लागणार होता. हे पाहून राजाने पंडितापुढे हात टेकले व त्याची योग्य सन्मानाने बोळवण केली.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon