दैनिक परिपाठ
08 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
🔺️ दिनविशेष
१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.
१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : ओक्साबोक्शी रडणे-मोठ्याने आवाज करत रडणे.
▪️वाक्य : सतीश नापास झाला, तेव्हा तो ओक्साबोक्शी रडला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : कांदा पडला पेवात,पिसा हिंडे गावात
▪️अर्थ : चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
🔺️ कोडे
▪️ वीस जणांचा शिरच्छेद केला,न मारला न केला खून,सांगा पाहू या कोड्याचे उत्तर?
▪️उत्तर - नेल कटर
🔺️ सामान्यज्ञान
१) पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?
उत्तर - विषुववृत्त
२) अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर - छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे नाव औरंगाबाद)
३) विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर - चिखलदरा
४) मुंबई – पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
किती आहे?
उत्तर - १७
५) २००८ मध्ये आकाशात पाठविल्या गेलेल्या यानाचे नाव काय होते?
उत्तर - चांद्रयान १
🔺️ बोधकथा
भोजन आणि मौन
कथा सिद्धार्थाच्या जीवनाशी निगडीत आहे. तेव्हा ते बुद्धत्वाला गेले नव्हते आणि ते निरंजना नदीच्याकाठी जंगलात वृक्षाखाली ध्यान करीत असत. सिद्धार्थ ध्यान केल्यानंतर जवळच्या गावात जावून भिक्षा मागून आणत असत. काही दिवसानंतर त्यांनी भिक्षा मागायला जाणे बंद केले. कारण एका गावात गावप्रधानाची छोटी मुलगी सुजाता त्यांना भोजन आणत असे. सिद्धार्थाना ती मोठ्या प्रेमाने भोजन देत असे. काही दिवसानंतर त्याच गावातला एक गुराखीही प्रभावित होवून सिद्धार्थांकडे येवू लागला. त्याचे नाव स्वस्ति होते.
एके दिवशी सिद्धार्थ स्वस्तिबरोबर चर्चा करीत होते. तेवढ्यात सुजाता भोजन घेवून आली. भोजन सुरु करताच त्यांनी चर्चा बंद केली. भोजन संपेपर्यंत ते गप्पच होते. तेथे शांतता पसरली. स्वस्ति या सिद्धार्थांच्या वागण्याने हैराण झाला. त्याने सिद्धार्थांचे भोजन आटोपल्यावर विचारले,"गुरुदेव ! मी आल्यानंतर आपण भरपूर चर्चा केली पण भोजनाच्या वेळी आपण एकही शब्द बोलला नाहीत, याचे कारण काय?" सिद्धार्थ म्हणाले,"भोजन निर्मिती मोठ्या कष्टाने होते. शेतकरी जमिनीची मशागत, नांगरणी करतो, बी पेरतो, रोपांची देखरेख करतो, धान्य तयार होते. त्या धान्यासाठी आपण धन खर्चतो, धान्य घरी आल्यावर ते निवडून टिपून त्याचे सुंदर असे अन्न तयार होते. घरातील महिला सुग्रास असे भोजन तयार करते. इतक्या कष्टाने तयार झालेल्या अन्नाचा आनंद आपण शांततेने तेव्हाच घेवू शकू जेव्हा आपले मन शांत असेल. त्यामुळे माझे मन शांत राहण्यासाठी मी भोजन करताना शांत राहतो आणि त्यामुळे माझे मन शांत राहते आणि अन्नाचा अपमान न होता मी त्या कष्टाने मिळवलेल्या सुग्रास अन्नाचा आनंद घेवू शकतो."
तात्पर्य - शांततेत केलेले भोजन हे न केवळ भूक मिटविते तर मानसिक आनंद आणि सात्विक ऊर्जाही देते.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon