सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 07 March

 

दैनिक परिपाठ

07 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

🔺️ दिनविशेष 
१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.

२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  आवर्जून पाहणे- मुद्दामहून पाहणे. 

▪️वाक्य : मुंबईमधले प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आवर्जून पाहावे असे आहे.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे.  

▪️अर्थ  : इतरांकडून आवश्यक ती मदत घ्यायची आणि वर आणखी काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.

🔺️ कोडे 
▪️ तीन हात व पोट आहे गोल, गरमीमधे होतो माझा उपयोग. ओळखा पाहू मी कोण? 

▪️उत्तर - पंखा

🔺️ सामान्यज्ञान 
१) आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील
घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक
कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19
तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील?
उत्तर - आयुष्मान भारत - पंतप्रधान
जनआरोग्य योजना
२) भारत सरकारने करोना व्हायरसचे
संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या
जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे?
 उत्तर - आरोग्य सेतू
३) ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने
कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला?
उत्तर - मालदीव
४) RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट
बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ  गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी
मर्यादा काय आहे?
उत्तर - १५ टक्के
५) कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य
मंत्रालय आणि MyGov सोबत आपल्या
मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक COVID-19
चॅटबोट लाँच केला आहे?
उत्तर - फेसबुक


🔺️ बोधकथा
                   माणूस व देश
इनामदार सर शाळेत फार प्रसिद्ध होते. कारण ते नेहमी आपला विषय जरा वेगळ्या पद्धतीने शिकवीत असत. इनामदार सर हे राष्ट्रभक्त होते. त्यांना आपला देश, मातृभूमी याबद्दल प्रेम होते. ते एक उपक्रमशील शिक्षक असल्याने त्यांनी एकेदिवशी मुलांना असाच एक उपक्रम सांगितला. भारताचा नकाशा ! भला मोठा नकाशा असलेला एक कागद त्यांनी बरोबर आणला. त्यावर विविध प्रांतांच्या हद्दी निरनिराळ्या रेषांनी दाखविल्या होत्या, शिवाय नकाशाच्या चित्राच्या मागेसुद्धा एक चित्र सरांनी काढला होता. मग त्यांनी कात्री घेतली, त्यामागील भागावर जे चित्र होतं, त्या चित्राचे जे निरनिराळे भाग होते त्यानुसार त्या चित्राचे तुकडे कापले, अर्थातच भारताच्या नकाशाचेही तुकडे झाले, मग सर म्हणाले, "मुलानो! आता हे तुकडे एकत्रित करा आणि भारताचे नकाशाचे चित्र पूर्ण करा," सारे विद्यार्थी सरसावले, हे तुकडे वेडेवाकडे कापले गेले होते.बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना ते चित्र जोडणे जमले नाही. त्याच वर्गात सलील नावाचा विद्यार्थी होता. तो पुढे आला आणि म्हणाला," सर मला एक संधी द्या मी चित्र पूर्ण करतो." सलील तुकडे जोडू लागला, त्याने नकाशाच्या बाजूने चित्र जोडले नाही तर मागील चित्राच्या बाजूने चित्र जोडायला सुरुवात केली, भारताचा नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचा चित्र इनामदार सरांनी काढला होता. सलीलने माणसाचं चित्र जोडला आणि भारताचा नकाशा तयार झाला. इनामदार सरांनी सलील ला शाबासकी दिली आणि म्हणाले, "देश म्हणजे सीमा नाहीत तर देश म्हणजे माणूस, माणूस जोडला कि आपोआपच देश जोडला जातो." 
तात्पर्य - माणसांचे हितसंबंध चांगले असले की देशाची एकात्मता सिद्ध होते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »