सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 38

 

ज्ञानकुंभ - 38   
     शब्दाची गंमत
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ शनिवार दिनांक 07/03/2026

उपक्रम : शब्दाची गंमत

१. म्हणे "शिरा" खाल्ल्याने  "शिरा" आखडतात.

२. " काढा" पिऊन मग एक झोप "काढा".

३. " हार" झाली की "हार" मिळत नाही. 

४. एक " खार " सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर " खार" खाऊन आहे.

५. "पळ" भर थांब, मग पळायचे तिथे " पळ".

६. " पालक" सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, "पालक" इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.

७. " दर" वर्षी काय रे "दर" वाढवता..?

८. " भाव" खाऊ नकोस, खराखरा "भाव" बोल.

९. नारळाचा " चव" पिळून घेतला तर त्याला काही "चव" राहत नाही.

१०. त्याने "सही"ची अगदी "सही सही" नक्कल केली.

११. "वर" पक्षाची खोली "वर" आहे.

१२. खोबर्‍यातला मुलांचा "वाटा" देऊन मग बाकीच्याची चटणी "वाटा".

१३. "विधान" सभेतील मंत्र्यांचे "विधान" चांगलेच गाजले.

१४. फाटलेला शर्ट "शिवत" नाही तोपर्यंत मी त्याला "शिवत" नाही.

१५. भटजी म्हणाले, "करा" हातात घेऊन विधी सुरू "करा".

१६. धार्मिक "विधी" करायला कोणताही "विधी" निषेध नसावा.

१७. अभियंता  म्हणाला, इथे "बांध" "बांध"

१८. उधळलेला " वळू" थबकला, मनात म्हणाला, इकडे " वळू" की तिकडे " वळू".

१९. कामासाठी भिजवलेली "वाळू" उन्हाने " वाळू" लागली.

२०. दरवर्षी नवा प्राणी "पाळत" निसर्गाशी बांधिलकी "पाळत" असतो.

२१. फुलांच्या "माळा" केसांत "माळा".


Previous
Next Post »