सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 23 February

दैनिक परिपाठ

23 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात,म्हणूनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

🔺️ दिनविशेष 

१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

१९६६: सीरियात लष्करी उठाव झाला.

१९९६ कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.

१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.

२०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 

▪️वाक्प्रचार व अर्थ :  अप्रूप वाटणे - अर्थ : आश्चर्य किंवा कौतुक वाटणे. 

▪️वाक्य : लहानगी मुग्धा जेव्हा शास्त्रीय संगीत गाते, तेव्हा श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही 

▪️अर्थ  : बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.

🔺️ कोडे

● मी जेवढा ओला होतो, तेवढाच तुम्हाला कोरडा करतो. सांगा पाहू मी कोण?
उत्तर - टाॅवेल

🔺️ सामान्यज्ञान 

1) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर: कळसूबाई (अहिल्यानगर जिल्हा)

2) भारताची 'सिलिकॉन व्हॅली' कोणत्या शहराला म्हणतात?​उत्तर: बेंगळुरू

3)  जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
​उत्तर : पॅसिफिक महासागर (प्रशांत महासागर)

4) 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही घोषणा कोणी केली?
​उत्तर : लोकमान्य टिळक

5)  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
​उत्तर : रायगड


🔺️ बोधकथा
संत फरीद आणि व्यापारी

एका व्यापाऱ्याला वाईट सवयी होत्या. त्याला या सवयींपासून सुटका करून घ्यावयाची होती. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तसे होवू शकले नाही. त्याला कुणीतरी संत फरीद यांचे नाव सुचविले, तो तत्काळ त्यांच्याकडे गेला. आणि आपल्याविषयीची सर्व माहिती सांगून विचारू लागला, "माझ्या वाईट सवयी कशा सुटतील?" संतानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो व्यापारी हट्टाला पोहोचला. त्याने रोजच येवून संताना विचारणे चालू केले. संत फरीद यांनीही त्याला रोजच टाळले. 

एके दिवशी व्यापारी अट्टाहासाला पेटला तेव्हा फरीद म्हणाले, "मी तुला काय मार्ग दाखवू? तुझे जीवन आता ४० दिवसांचे उरले आहे. इतक्या कमी दिवसात तू कसा सुधारशील? तुझ्या वाईट सवयी कशा काय सुटतील?"  हे ऐकताच व्यापारी तणावात आला. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला. इतके दिवस केलेल्या वाईट कर्मांची त्याला लाज वाटू लागली, सारखा पश्चाताप करू लागला. संत सहवासात राहणे, भजन पूजन करणे, सात्विक खाणे पिणे, शुद्ध आचरण करणे इत्यादी क्रिया तो करू लागला.

शेवटी ४० वा दिवस उजाडला, व्यापारी मरणाची वाट पाहत होता. अचानक त्याला संत फरीद यांनी बोलावले व सांगितले, "मुला, या ३९ दिवसांचा विचार करता तूच मला सांग की या ३९ दिवसांत तू किती वेळेला दुष्टपणे वागला, खोटे बोलला, वाईट कर्म केले?" व्यापारी म्हणाला," हे जे तुम्ही म्हणता ते एकदाही केले नाही. पण त्याचा माझ्या मरणाशी काय संबंध?" संत म्हणाले, "यालाच मरणाची भीती म्हणतात. रोजचा दिवस हाच जर आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून घालविला तर वाईट कृत्ये माणसाकडून होत नाहीत. माणसाने असे काम केले पाहिजे. त्याच्या मागेसुद्धा त्याचे नाव निघाले पाहिजे." यानंतर व्यापारी सुधारला व त्याच्यातील वाईट सवयी निघून गेल्या. त्याच्यातील चांगल्या गुणांना संतानी वेगळ्या पद्धतीने जागृत केले. 

तात्पर्य - मानवी जीवनाचा भरवसा नाही. तेव्हा आता मिळालेल्या क्षणातुनच सद्वर्तन आणि सत्कर्म केले जावू शकते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »