दैनिक परिपाठ
22 फेब्रुवारी
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.
🔺️ दिनविशेष
१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : अजरामर होणे - अर्थ : कायमस्वरूपी टिकणे.
▪️वाक्य : क्रांतिकारकांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहे.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : काप गेले नी भोके राहिली
▪️अर्थ : सारे ऐश्वर्य गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.
🔺️ कोडे
▪️लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा?
▪️उत्तर - ओवा
🔺️ सामान्यज्ञान
१) होमो सेपियन मानवाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर - क्रोमॅनॉन
२) मुला-मुलींमध्ये भेदभाव न करणे म्हणजे काय ?
उत्तर - समानता
३) दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणे म्हणजे काय ?
उत्तर - सहिष्णुता
४) नारळाचा बीजप्रसार कसा होतो?
उत्तर - पाण्यामार्फत
५) रक्तवाहिन्यांतून रक्त फिरते राहणे म्हणजे काय ?
उत्तर - रक्ताभिसरण
🔺️ बोधकथा
पती- पत्नी आणि त्यांचा मुलगा
एक भक्त कुटुंब होतं. त्यात पती-पत्नीव्यतीरिक्त त्यांचा मुलगाही होता. तिघेही ईश्वरावर विश्वास ठेवत नसत. एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. त्यांनी खूप उपचार केले. पण तो ठीक झाला नाही. त्याचवेळी पतीला एका कामासाठी दुसऱ्या शहरात कामासाठी जावे लागले, त्याने पत्नीकडे चिंता व्यक्त केली. मात्र पत्नीने त्याला आश्वासन दिले कि ती मुलाची यथायोग्य काळजी घेईल.
पती गावाला निघून गेला. दुर्दैवाने तो जाताच मुलगा मरण पावला. पत्नीने मोठ्या धैर्याने मुलाचे प्रेत झाकून ठेवले आणि संध्याकाळी पती येण्याच्या वेळेत स्वयंपाक करू लागली, पतीने येताच विचारले, मुलाची तब्येत कशी आहे? पत्नी म्हणाली, आज तो विश्रांती घेत आहे. तुम्ही आधी जेवण करून घ्या. त्यानंतर त्याच्याकडे जा. पती जेवण करू लागला. तेव्हा पत्नी म्हणाली, "शेजारणीने माझ्याकडे भांड्यात पाणी मागितले होते, मी तिला दिले, आता जेव्हा मी माझे भांडे मागत आहे, तेव्हा ती माझ्यावरच चिडत आहे. भांडत आहे व भांडे माझेच म्हणून हट्ट धरून रडत बसली आहे." पती म्हणाला,"मूर्ख बाई आहे ती ! दुसऱ्याची वस्तू परत करण्यासाठी कुठे रडत बसायचे असते का?" तोपर्यंत पतीचे भोजन झाले होते. तेव्हा पत्नी म्हणाली, "आपला मुलगा हे पण ईश्वराचे देणे होते, ती वस्तू आज ईश्वराने परत मागून घेतली आहे. मग आपणही शेजारणीसारखे रडत बसायचे का?" पतीने पत्नीच्या तोंडाकडे पाहिले आणि त्याला सगळा मामला समजून आला, तो म्हणाला,तू ठीक म्हणतेस. मग त्या दोघांनी मिळून आपल्या मुलाचे पुढील अंतिम संस्कार मोठ्या धैर्याने पूर्ण केले.
तात्पर्य - मानवी जीवन परमेश्वराची देणगी आहे. ते संपल्यावर आपले काहीच चालत नाही.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon