सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 13 February

दैनिक परिपाठ

13 फेब्रुवारी  


🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

'दैनिक परिपाठ' या सदरात काही सूचना,बदल,सुधारणा आवश्यक असतील तर कृपया comment करावी. आपल्या अमूल्य मताचा आदर केला जाईल.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7


🔺️सुविचार 
आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.

🔺️ दिनविशेष 
१९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

१९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

२००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : स्तुती करणे - प्रशंसा करणे, गुणगान गाणे. 

▪️वाक्य : सम्यकने परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर शिक्षकांनी त्याची स्तुती केली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर

▪️अर्थ  : गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे.

🔺️ कोडे 
▪️संपूर्ण पृथ्वीची करतो मी सैर परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर.दिवसा काढून झोपा रात्रभर मी जागतो. 
सांगा पाहू मी कोण? 

▪️उत्तर- चंद्र

🔺️ सामान्यज्ञान 
१) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गव्हाचे पीक काढले जाते ?
उत्तर - पंजाब

२) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात तिखट पदार्थ खाल्ले जातात ?
उत्तर - राजस्थान

३) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गोड पदार्थ खाल्ले जातात ?
उत्तर - गुजरात

४) राजस्थान राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर - जयपुर

५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते ?
 उत्तर - बेंगलोर

🔺️ बोधकथा
शिकारी आणि कबुतर  

एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु-पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुःखात असलेले पाहिले.ती भावनावश झाली.

ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.

तात्पर्य - माणसाची सुप्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »