ज्ञानकुंभ - 21
वर्णनावरून भाज्या ओळखा.
🔶️ संकलित
❇️ गुरुवार दिनांक 12/02/2026
उपक्रम : वर्णनावरून भाज्या ओळखा.
● प्रश्नसूची
पुढील वर्णनावरून भाज्या ओळखा.
1) माणूस म्हणलं की होणारच
2) ही अशी नजर म्हणजे धाकच बाई
3) हे फळ म्हणजे एक तीर्थक्षेत्र
4) याला 'ट' लावलं की झालं प्राण्याचे
5) यातला 'ब' काढला की बाय-बाय
6) याला कापलं कि याने रडवलंच समजा
7) चार बायका एकत्र आल्या की त्यांचा संपतच नाही
8) पुण्या जवळून वाहणारी नदी
9) सांभाळ करणारे
10) पाठ खरबड, खायची परवड
11) बायकांची नाजूक नाजूक बोटं (इंग्रजीत)
12) फुल च, पण जरा जाडजूड आणि वेगळं
13) थंड हवेचं, बर्फाळ प्रदेशातील एक पर्यटन स्थळ
14) केसांची एक प्रकारची रचना, फक्त शेवटी वेलांटी द्या
15) गोष्टीतल्या म्हातारीची गाडी
● उत्तरसूची
1) माणूस म्हणलं की होणारच - चुका
2) ही अशी नजर म्हणजे धाकच बाई - करडई
3) हे फळ म्हणजे एक तीर्थक्षेत्र - काशीफळ
4) याला 'ट' लावलं की झालं प्राण्यांचे - शेपूट
5) यातला 'ब' काढला की बाय-बाय - बटाटा
6) याला कापलं कि याने रडवलंच समजा - कांदा
7) चार बायका एकत्र आल्या की त्यांचा संपतच नाही - घोळ
8) पुण्याजवळून वाहणारी नदी - मुळा
9) सांभाळ करणारे - पालक
10) पाठ खरबड, खायची परवड - कारले
11) बायकांची नाजूक नाजूक बोटं - लेडीज फिंगर (भेंडी)
12) फुलच, पण जरा जाडजूड आणि वेगळं - फ्लॉवर
13) थंड हवेचं, बर्फाळ प्रदेशातील एक पर्यटन स्थळ - सिमला
14) केसांची एक प्रकारची रचना, फक्त शेवटी वेलांटी द्या - अंबाडी
15) गोष्टीतल्या म्हातारीची गाडी - भोपळा

ConversionConversion EmoticonEmoticon