सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 22

 

ज्ञानकुंभ - 22  
वर्णनावरून अकारांत शब्द ओळखा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ शुक्रवार दिनांक 13/02/2026

उपक्रम : वर्णनावरून अकारांत शब्द ओळखा.

खाली दिलेल्या प्रश्र्नासाठी उत्तर /पर्यायी/समानार्थी शब्द लिहायचा आहे.

कुठलाही काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडाक्षर वा अनुस्वार नसलेले उत्तर असावे. (एका शब्दात)

🔺️ प्रश्नसूची 

१ रोज देवाला करावे___

२ रामायणातील एक नाव____

३ एका गावाचे नाव__

४ एका मुलाचे नाव__

५ एका मुलीचे नाव___

६ एक आडनाव__

७ भाजीत वरणात टाकतात ती__

८ बशीचा जोडीदार__

९ स्त्रीच्या एका अलंकाराचे नाव

१० एका सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव

११ पाण्यात राहणारा प्राणी 

१२ माती विटांनी बांधतात ते 

१३ उन्हाळ्यात करतात त्या थंड पेयाचे नाव

१४ उपवासाला खातात तो पदार्थं 

१५ रामाच्या पित्याचे नाव

१६ सीतेच्या वडिलाचे नाव काय 

१७ एका चित्रपटाचे नाव

१८ एका अभिनेत्याचे नाव

१९ एका भाजीचे नाव

२० एका फळाचे नाव

२१ एका मिठाईचे नाव

२२ शरीराचा एक अवयव

२३ जखमेवर लावतात ते 

२४ माणसाला चुकत नाही ते

२५ नदीेचे पाणी अडवून बांधतात ते

२६ चिखलात उमलते ते

२७ हिंदीत विषाला म्हणतात

२८ गुंड लहान मुलाचे करतात ते 

२९ हिवाळ्यात गवतावर पडते ते

३० पाऊस पडल्यावर मोकळ्या जागेत उगवते ते

🔺️ उत्तरसूची

१ रोज देवाला करावे - नमन

२ रामायणातील एक नाव - दशरथ

३ एका गावाचे नाव - हल

४ एका मुलाचे नाव - शरद

५ एका मुलीचे नाव - कमल

६ एक आडनाव - परब

७ भाजीत वरणात टाकतात ती - हळद

८ बशीचा जोडीदार - कप

९ स्त्रीच्या एका अलंकाराचे नाव - नथ

१० एका सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव - अजगर

११ पाण्यात राहणारा प्राणी  - मगर

१२ माती विटांनी बांधतात ते  - घर

१३ उन्हाळ्यात करतात त्या थंड पेयाचे नाव - सरबत

१४ उपवासाला खातात तो पदार्थं - फळ

१५ रामाच्या पित्याचे नाव - दशरथ

१६ सीतेच्या वडिलाचे नाव काय - जनक

१७ एका चित्रपटाचे नाव - डर

१८ एका अभिनेत्याचे नाव - शरद

१९ एका भाजीचे नाव - करडई

२० एका फळाचे नाव - अननस

२१ एका मिठाईचे नाव - खरवस

२२ शरीराचा एक अवयव - नख

२३ जखमेवर लावतात ते - मलम

२४ माणसाला चुकत नाही ते - मरण

२५ नदीेचे पाणी अडवून बांधतात ते - धरण

२६ चिखलात उमलते ते - कमळ

२७ हिंदीत विषाला म्हणतात - जहर

२८ गुंड लहान मुलाचे करतात ते - अपहरण

२९ हिवाळ्यात गवतावर पडते ते - दव

३० पाऊस पडल्यावर मोकळ्या जागेत उगवते ते - गवत

Newest
Previous
Next Post »