सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Gajanan Pote भारत देशा भारत देशा

 

भारत देशा भारत देशा

वेगळ्या प्रांताची वेगळी भाषा ।।
धर्म वेगळे पंथ वेगळे
एकतेचे वारे वाहतात चोहीकडे।।
भारत देशा भारत देशा
सुखी समृध्द चारी दिशा ।।
विविध नद्या वाहती
सिंधु तुझे पदकमल धुती ।।
विविध पर्वत रांगा दिसती
विंध्य, हिमालय, तुला रक्षिती।।
कुठे गारवा, कुठे उष्ण वारे झोंबती
शेतामध्ये विविध पिके डोलती ।।
विविध ऋतुंची येथे नवलाई
उन्हामुळे होई लाहीलाही ।।
पावसाची सर आनंद देऊन जाई
हिवाळा आरोग्य वरदान देई।।
वेश वेगळे, बोली वेगळी
असो वातावरणातील बदल वेगळे ।।
तरी नांदते येथे मानवाच्या मनात समता,बंधुता
विविधतेत सदैव टिकून राहिल एकता ।।

कवि गजानन दशरथ पोटे
मु .पो. न्यु तापडिया नगर खरप रोड अकोला
मो. नं. ९९२३९७८७७५




Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
13 October 2022 at 21:32 ×

नमस्कार मी गजानन दशरथ पोटे माझ्या कवितेच्या खाली जो नंबर दिला आहे त्यात बदल झाला आहे आता माझा मोबाईल नंबर 9923208775 हा आहे

Congrats bro Gajanan Dasharath Pote you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar