आम्ही भारतीय
भिन्न धर्म भिन्न जाती
जरी विविधतेचा भास
परी तना मनातून एकतेचा श्वास
आम्ही भारत देशाचे दास.....
कोणी हिंदू कोणी मुस्लिम
अवघे मिळूनी संस्कृती नांदते
दृढ आमचे माणुसकीचे नाते
आम्ही भारताचे भाग्यविधाते.....
कधी ढाल कधी तलवार
पेटवूनी क्रांतीची मशाल
करितो प्राणांचे बलिदान
आम्ही भारत मातेचे पुत्र महान.....
जगाला प्रेम अर्पण करतो
विश्व शांतीचा संदेश देतो
संस्कृतीची परंपरा जपतो
अभिमानाने भारतीय म्हणवितो......
सौ पुष्पलता आनंदराव पाटील
जिल्हा परिषद शाळा कृष्णानगर
तालुका पाचोरा जिल्हा जळगाव
ConversionConversion EmoticonEmoticon