सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Reshma Sakpal आमची भारतमाता

 

आमची भारतमाता


माथी शोभे रत्नहिमालय
चरणी वाहे हिंद सरिता
विविधतेतली जपे एकता
जगती एकचि भारतमाता..

संताचीही पावनभूमी
वीरांचीही अमरगाथा
युगयुगांची असे परंपरा
चरणी वाहू सदैव माथा....

अनेक भाषा,अनेक जाती
बंधुभाव हा धर्म आपला
नागरिक असू भारतभूचे
सलाम देऊ संविधानाला...

सहयाद्रिची निधडी छाती
दख्खनच कणखर बाणा
सुजलाम् सुफलाम् धरणी
ताजमहल दिसे देखणा....

फडफडणारा तिरंगी झेंडा
कथा सांगतो बलिदानाची
प्राणप्रिय स्वातंत्र्य आपुले
साक्ष आहे इतिहासाची....

एकच माता,लाखो लेकरे
सदैव राखू तिचा मान
रक्षण करण्या मातृभूमीचे
करू प्राणाचे बलिदान....

सौ. रेश्मा अभिजीत संकपाळ
गाव-लोणी ता.खंडाळा जि.सातारा
Previous
Next Post »