सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Avinash Kavale गड्यांनो भारत आपला श्रेष्ठ

गड्यांनो भारत आपला श्रेष्ठ

प्राचीन सिंधू संस्कृती जेष्ठ.
वास्तू-लेणी, चित्र-शिल्पे श्रेष्ठ. 
किर्तीमान पराक्रमी इतिहास वरिष्ठ.
साधू संतांची शिकवण इष्ट.
रे गड्यांनो भारत आपला श्रेष्ठ....

उंच हिमालय, नद्या -डोंगरे गर्विष्ठ.
समुद्र- तट, लता-वृक्ष,संपन्न भूमी श्रेष्ठ.
धन-धान्य,फुले-फळे नटले इष्ट.
रे गड्यांनो भारत आपला श्रेष्ठ...

क्रांतीकारक बलिदानाचे धारिष्ठ.
स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्र एकनिष्ठ.
 फडकला डौलात तिरंगा सर्वात जेष्ठ. 
 हाकलून लावले जुल्मी परकीय शिष्ट. 
 रे गड्यांनो भारत आपला श्रेष्ठ...

अनेक भाषा, विविध पंथ,धर्म श्रेष्ठ. 
 विविध संस्कृती अनेक प्रांत जेष्ठ.
देशाच्या अस्मितेसाठी राष्ट्र एकनिष्ठ.
 सिमेवरील साहसी जवान बलिष्ठ.
 रे गड्यांनो भारत आपला श्रेष्ठ...

उत्पादन निर्मितीत आपण जेष्ठ.
विज्ञान तंत्रज्ञानात नाही कनिष्ठ. 
 कला कौशल्य आपले चौसष्ठ. 
 धैर्यशील मानुसकी धर्म आपले बलिष्ठ. 
 रे गड्यांनो भारत आपला सर्वर्श्रेष्ठ.

अविनाश कावळे
स्टेशन चेंबूर मनपा उर्दू शाळा, चेंबूर, मुंबई. 89. 
 avikaw5678@gmail.com
Previous
Next Post »